Viral Video Today: मागील काही महिन्यांमध्ये आपण अनेकदा कुत्र्यांचा माणसांवर हल्ला अशी उदाहरणे पाहिली आहेत. अक्षरशः रक्तबंबाळ करणाऱ्या या हल्ल्यात पिटबुल हा कुत्रा अधिक हिंसक असल्याचे दिसून आले होते. त्यावेळेसही पिटबुल चा असाच एक हल्ला व्हायरल होत आहे. यावेळेस माणसावर नाही तर चक्क चपळ व शक्तिशाली घोड्यावर पिटबुलने हल्ला चढवला आहे. घोड्याचा जबडाच तोंडात धरून पिटबुलने त्याला पार पळता भुई थोडी केली होती. हा भयंकर व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. यामध्ये चूक नेमकी कोणाची, कुत्र्याची, घोड्याची की त्यांच्या मालकांची यावरून व्हिडिओच्या कमेंटबॉक्समध्ये वेगळीच चर्चा होत आहे. तुम्हाला काय वाटतं हे आधी व्हिडीओ बघून सांगा..

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक प्रवासी टांगा रस्त्यात एके ठिकाणी थांबला आहे. त्यावेळी अचानक एक पिटबुल मागून येतो व टांग्याला बांधलेल्या घोड्यावर हल्ला करतो. वास्तविक बांधलेला असतानाही घोड्याची शक्ती ही पिटबुलपेक्षा अधिकच असली तरी पिटबुलचा हल्लाच इतका अनपेक्षित व भयानक होता की घोड्याला काय करावं सुचलंच नसावं. पिटबुलने या व्हिडीओमध्ये घोड्याचा पूर्ण जबडाच आपल्या तोंडात धरला आहे.

अन कुत्र्याने पार घोड्याचा जबडाच धरला..

Video: शार्कने जबडा उघडला, तीक्ष्ण दात पाहून स्कुबा डायव्हरने थेट…;अंगावर काटा आणणार ‘तो’ क्षण पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही एकतर्फी लढाई पाहून आजूबाजूच्या लोकांनी मध्यस्थी केली व कुत्र्याला पळवून लावले . @animals_powers या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला आता पर्यंत लाखो व्ह्यूज व हजारो लाईक्स व कमेंट्स आहेत. पिटबुल हा तसा पाळीव कुत्रा आहे पण अलीकडचे पिटबुलचे हल्ले पाहता या कुत्र्याला घरात पाळणे कितपत सुरक्षित आहे हा प्रश्नच आहे.