Policeman Slaps Female Tourist Viral Video: उत्तराखंडमधील नैनिताल येथील एका पोलिसाने एका महिला पर्यटकाला कानशिलात लगावल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी रोष व्यक्त केला आहे.पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
रामगड चौकीजवळ ही घटना घडली आणि पर्यटकांच्या गटाने हा सर्व प्रकार शुट केला आहे. व्हिडिओमध्ये, यू.एन. गुलाब कंबोज म्हणून ओळखला जाणारा पोलिस अधिकारी स्कूटी चालवताना हेल्मेट न घातल्याबद्दल त्या पर्यटकांच्या गटाला थांबवतो. हा पोलिस अधिकाऱ्याने व्हिडिओ शुट करणाऱ्या व्यक्तीला कानशिलात लगावल्याचे दावा केला जात आहे. व्हिडीओमध्ये मोबाईल कॅमेरा जमिनीवर पडल्याचा आणि महिला पर्यटकांचा ओरडण्याचा आवाज ऐकू येत आहे.
दिल्लीतील पर्यटकांचा हा व्हिडिओ शेअर करत निराशा व्यक्त केली आहे.व्हिडीओच्या सुरुवातीला पोलिस अधिकारी आपल्या कर्मचाऱ्या व्हिडिओ शुट करण्याची सुचना देत आहे. त्यावर तरुणी हो शुट करा असते म्हणतात आणि त्यानंतर एक तरुणी पोलिस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारते की,”सर, तिच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे?
त्यावर पोलिस अधिकारी चिडून म्हणतो, तुम्ही तुमचे सांगा, तुम्ही त्याची बादू का घेत आहात.”
त्यानंतर तरुणी म्हणते की, आमच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना होता का? त्यावर अधिका हो असे उत्तर देतो. आणि अजून काय होते असे विचारतो.
त्यानंतर तरुणी म्हणते,हेल्मेट होते? त्यावर तो हो म्हणतो आणि विचारतो की मागे बसणाऱ्याकडे हेल्मेट होते का? त्यावर सर्वजण ओरडून सांगतात की दोघांनी हेल्मेट घातले होते.
त्यानंतर तरुणी म्हणते की, आताच दोन तरुण असेच हेल्मेट घालून गेले त्यांना का नाही अडवले तुम्ही. उत्तर द्या.
त्यावर अधिकारी म्हणतो की, इथे उभे राहा आणि आमची चेकिंग प्रक्रिया पूर्ण करा. त्यानंतर तो अधिकारी कॅमेरा हाताने पाडताना दिसत आहे. तरुणींचा ओरडाना आवाज येतो. तुमची हिंमत कशी झाली असे एक तरुणी ओरडत आहे. त्यानंतर तरुणी मोबाईल उचलते आणि कॅमेऱ्यामध्ये पाहून सांगते की,
व्हिडिओमध्ये एक तरुणी सांगते की,, “आम्ही दिल्लीहून नैनितालला भेट देण्यासाठी आलो होतो आणि पोलिसांनी आम्हाला फक्त हेल्मेट न घातल्याबद्दल थांबवले.” सुमारे एक मिनिट चाललेल्या या व्हिडिओमध्ये महिला स्पष्टपणे अस्वस्थ झाल्या आहेत आणि परिस्थिती तणावपूर्ण असल्याची दिसत आहे.
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया हा व्हिडिओ @Cyber_Huntss ने X वर पोस्ट केला होता, जिथे त्याला २ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. पोस्टमध्ये पोलिस कर्मचाऱ्याच्या कृतीवर टीका करण्यात आली होती आणि उत्तराखंड सरकारकडून कारवाईची मागणी करण्यात आली होती.
काही लोक शारीरिक बळाचा वापर केल्याबद्दल अधिकाऱ्यावर संतापले होते, तर काहींनी पर्यटकांना अधिक सहकार्य करायला हवे होते असे म्हटले होते.
एका कमेंटमध्ये विचारण्यात आले होते की, “त्यांना इतके धाडस कसे आले? आतापर्यंत काय केले गेले आहे?”
उत्तराखंड पोलिसांनी प्रतिसाद दिला (Uttarakhand Police Respond)
उत्तराखंड पोलिसांनी तातडीने प्रतिसाद दिला आणि सांगितले की ही घटना नियमित वाहन तपासणी दरम्यान घडली. त्यांनी स्पष्ट केले की, स्कूटीला नंबर प्लेट नव्हती, नोंदणी कागदपत्रे नव्हती आणि प्रवाशाने हेल्मेट घातले नव्हते. पोलिसांनी भांडणाची कबुली दिली आणि चौकशी करण्याचे आश्वासन दिले.
त्यांनी सांगितले की, “आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर नियमांनुसार कारवाई करू, मग तो चालक असो, पोलिस असो किंवा वाहन मालक असो.”
नैनिताल पोलिस निष्पक्ष चौकशी करतील आणि कायदा आणि सुव्यवस्था राखतील असे आश्वासन पोलिसांनी जनतेला दिले.