Viral Video: आजकालच्या शालेय शिक्षणात आणि पूर्वीच्या शालेय शिक्षणात जमीन-अस्मानाचा फरक पाहायला मिळतो. केवळ शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही मोठा फरक पाहायला मिळतो. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात केवळ मुलांनी अभ्यास करून यश मिळवावं हाच हेतू असायचा. परंतु, बदलत्या काळानुसार आता शाळेत मुलांचे छंद, कला, आवड-निवड या सर्व गोष्टींकडेही लक्ष दिले जाते. शिवाय हल्ली शिक्षकही शाळा, कॉलेजांमध्ये बिनधास्त आपली कला सादर करताना दिसतात.
हल्ली समाजमाध्यमांवर कधी कोणता व्हिडीओ तुफान व्हायरल होईल ते सांगता येत नाही. अनेकदा शाळा किंवा कॉलेजमधील शिक्षकांचे शाळेत शिकवितानाचे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता कॉलेजातील असा एक व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात शिक्षक चक्क डान्स करताना दिसतोय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॉलेजबाहेरच्या परिसरात शिक्षक‘मुकाबला ’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. शिक्षकाच्या डान्स स्टेप्स अन् चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीह त्यांचे कौतुक कराल.
पाहा व्हिडीओ:
हा सोशल मीडियावर खूप चर्चेत असलेला व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gatalbum या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला सहा मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक नेटकरी यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “एक नंबर नाचला सर.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “डान्स मास्टर सर” तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “सर तुम्ही ग्रेट आहात”