Viral Video: समाजमाध्यमांवर कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नव्हे तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘एक नंबर तुझी कंबर’ या मराठमोळ्या गाण्यानेही समाजमाध्यमांवर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रील्स बनवून समाजमाध्यमांवर धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक मराठी कलाकार, तसेच परदेशांतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.

आतापर्यंत ‘एक नंबर तुझी कंबर’वर भारतीयांसह परदेशातील अनेक प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचे डान्स व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, ज्यात किली पॉलसारख्या अनेक कलाकारांचा समावेश आहे. दरम्यान, आता या व्हायरल व्हिडीओमध्ये समाजमाध्यमांवर प्रसिद्ध असलेला ‘डान्सिंग डॅड’ ऊर्फ रिकी पाँड या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रिकी पाँड ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करीत आहे. यावेळी तो गाण्यातील प्रत्येक स्टेप अगदी हुबेहूब करीत आहे. त्याशिवाय त्याच्या चेहऱ्यावरील हावभावदेखील खूप सुंदर आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Ricky Pond (@ricky.pond)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @ricky.pond या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या गाण्याला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि २१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर युजर्स अनेक कमेंट्स करतानाही दिसत आहेत. त्यावर एकाने लिहिलेय, “खतरनाक डान्स भाऊ.” दुसऱ्या एकाने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप छान सर.” आणखी एकाने लिहिलेय, “एकदम जबरदस्त डान्स केला.” तर आणखी एकाने लिहिलेय, “जबरदस्त.”