Viral Video: कोणताही ऋतू असो, कुटुंबातील सदस्य किंवा मोठ्या मंडळींकडून बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊ नका असे वारंवार सांगितले जाते. तरीही आपल्यातील अनेक जण स्टॉलवरील जंक फूड, बेकरीचे प्रोडक्ट, निरनिराळ्य पेयाचा आस्वाद घेतात. पण, हे पदार्थ कसे बनवले जातात? ते बनवताना कामगार किंवा मालक दुकानाची स्वच्छता राखतात का? याबद्दल आपण जराही विचार करत नाही आणि सर्रास हे पदार्थ बाहेरून विकत आणतो. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका बेकरी मालकाने केलेलं कृत्य पाहून तुम्ही स्वतःला बेकरी प्रोडक्ट खाण्यापासून नक्कीच थांबवाल.

व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, रस्त्याकडेला एक बेकरी आहे. या बेकरीत काही खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवले आहेत, तर काही उघड्यावर ठेवले आहेत. दुकानाचा मालक दुकानाबाहेर केर काढत असतो. केर काढता काढता तो कचरा गोळा करण्यास सुरुवात करतो. बघता बघता तो गोळा करण्यात आलेला कचरा बेकरीत ठेवलेल्या उघड्या खाद्यपदार्थांमध्ये टाकतो; जे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. नक्की काय घडलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…ऑफ रोड ड्रायव्हिंग करणाऱ्या चालकाला पाहून आनंद महिंद्रांनी शेअर केला ‘तो’ VIDEO; म्हणाले, ‘रस्ता कितीही…’

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, बेकरीचा मालक केर काढताना अलगद कचऱ्याचा काही भाग उचलून बेकरीच्या काचेच्या कपाटावर ठेवलेल्या पदार्थांमध्ये टाकतो. हे कृत्य करत असताना त्याच्या शेजारहून काही नागरिकसुद्धा जातात, हे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटते. पण, ते काही न बोलता तेथून निघून जातात. तेथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा व्हिडीओ स्वतःच्या मोबाइलमध्ये शूट करून घेतला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे; जो सध्या सगळ्यांना विचार करायला भाग पाडत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Incognito_qfs या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरीसुद्धा संताप व्यक्त करताना दिसत आहेत. कचरा टाकलेले बेकरी प्रोडक्ट त्यानंतर कित्येक जणांनी खरेदी केले असतील, तर कित्येक जणांनी त्याचा आस्वाद घेतला असेल याची कोणी कल्पनादेखील केली नसेल. एकूणच ग्राहकांच्या आरोग्याची चिंता न करता सर्रास असे कृत्य अनेक व्यापारी करत असतील; जी खरंच खूप चिंतेची बाब आहे.