‘डर के आगे जीत है…’ हे हिंदीतील प्रसिद्ध वाक्य कोणत्याही संकटाला न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास त्यातून बाहेर पडता येते, हे सूचित करते. याचीच प्रचिती सध्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून येत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसत आहे. पण कुत्रा समोर बिबट्या असतानाही न घाबरता उलट त्याच्यावरच भुंकू लागतो. कुत्र्याचा हा अवतार बघून शेवटी बिबट्याला माघार घ्यावी लागते. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

व्हायरल व्हिडीओ :

Viral News : पाकिस्तानी पोलिसाच्या बँक अकाउंटवर पगाराबरोबर आले तब्बल १० कोटी रुपये; बँकेला समजताच…

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. ‘जर कुत्रा घाबरला असता तर नक्कीच या बिबट्याचा शिकार झाला असता’ अशा कमेंट्स काही जणांनी केल्या आहेत. कुत्र्याने न घाबरता या संकटाचा सामना केला, म्हणूनच त्याचा जीव वाचला. अशाचप्रकारे कोणतेही संकट आले तरी न घाबरता, न डगमगता त्याला आत्मविश्वासाने सामोरे जाता आले, तर ते संकटही टाळता येते हे या व्हिडीओतून सिद्ध होते.