Viral Video Shows Boy Emotional Reaction : मुलं आणि त्यांचे क्रिकेटवर असणारं प्रेम याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. त्यांना बॅट, बॉल घेऊन चाळीत, समुद्रकिनारी, तर कधी मैदानात क्रिकेट खेळायला प्रचंड आवडते. अशातच क्रिकेट खेळण्यासाठी क्रिकेट किट घेण्याचे स्वप्नसुद्धा त्यांच्या मनात अगदी लहानपणापासून घर करून असते. तसेच हेच क्रिकेट किट जर कोणी त्यांना सरप्राईज म्हणून दिलं, तर त्यांना किती आनंद होईल याचा तुम्ही विचार करू शकता का? नाही… तर, आज व्हायरल व्हिडीओत ( Viral Video) असंच काहीसं पाहायला मिळालं आहे.

व्हायरल व्हिडीओतील (viral Video) चिमुकल्याचा वाढदिवस असतो. लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याच्या कुटुंबानं सरप्राईज प्लॅन केलेलं असतं. चिमुकला घरी येण्याआधी घराची सजावट करण्यात आलेली असते. त्याच्यासाठी एक खास गिफ्टसुद्धा आणलेलं असतं. या खास गिफ्टवर एक चादर ओढून ठेवलेली असते. तितक्यात चिमुकल्याची एंट्री होते. एंट्री होताच समोर दिसणारी चादर तो बाजूला काढतो आणि गिफ्ट पाहून जोरजोरात उड्या मारायला लागतो. नेमकं कुटुंबानं काय दिलं ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

हेही वाचा…VIRAL VIDEO : ६० हत्तींना ट्रेनखाली चिरडण्यापासून वाचवलं; लोको पायलटच्या ‘त्या’ कृतीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

व्हिडीओ नक्की बघा…

क्रिकेट किटला हात न लावताच बहिणीला मिठी मारतो…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चिमुकला घरात येताच वाढदिवसाचं भलंमोठं गिफ्ट पाहतो. पण, त्यावर चादर टाकलेली असते. चादर काढताच चिमुकल्याला क्रिकेट किट दिसतं. क्रिकेट किटला हात न लावताच तो चादर हातात धरून, जोरजोरात उड्या मारायला लागतो आणि बहिणीला मिठी मारतो. त्यानंतर बाबांकडे जातो आणि त्यांचे आभार मानत त्यांना मिठी मारतो. यादरम्यान आनंदाश्रूंनी चिमुकल्याच्या डोळे डबडबल्याचे तुम्ही पाहू शकता. हेलावलेले आई-बाबाही या क्षणाचा व्हिडीओ आपल्या आठवणींच्या खजिन्यात जतन करण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद करून घेत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @almsports01 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक होत आहेत. एका युजरने कमेंट केली की, त्याने किटला स्पर्शही केला नाही आणि तो थेट बहिणीला मिठी मारायला गेला. तर दुसरा म्हणतोय की, बालपण खूप चांगले होते. वाढदिवशी होणारा हा आनंद मलासुद्धा हवा आहे. तर तिसरा म्हणतोय की, त्याने वडिलांना मिठी मारली तेव्हा मी खरोखर रडलो आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.