Viral Video: रोज सकाळी सायकलवरून ट्रिंग ट्रिंग करत विक्रेता पेटीतून तुमचे आवडते बेकारीचे पदार्थ घेऊन येतो. तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात सुद्धा बेकारी असतील. ज्यात त्यात पाव, नानकट बिस्किटे, क्रीम पाव, रोल, पेस्ट्री आणि यातच सगळ्यांचा आवडता म्हणजे ‘क्रिम रोल’ याचाही समावेश असेल. आईस्क्रीम सारखा हुबेहूब दिसणारा हा पदार्थ वरून पांढरी क्रीम आणि खाली कुरकुरीत रोल खाण्याची मजाचं काही वेगळी आहे . तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात सगळ्यांच्या आवडीचा हा क्रिम रोल कसा बनवला जातो याची एक झलक दाखवण्यात आली आहे.
व्हायरल व्हिडीओ अमृतसरचा आहे. कामगार एका भांड्यात पीठ घेऊन त्यात तेल ओतून पीठ व्यवस्थित मळून घेताना दिसत आहे. त्यानंतर या पिठाची एक मोठी पोळी लाटून घेतली आहे. त्यानंतर या पोळीचे एकसमान सुरीने उभे काप करून घेतले आहेत. त्यानंतर सुरीने कापून घेतलेलं उभे काप रोलरवर गुंडाळून घेतले आहेत. त्यानंतर एका ट्रेमधून हे सर्व क्रिम रोल भट्टीत भाजून घेतले आहेत. तुम्हीसुद्धा बघा कसे बनवले जातात क्रिम रोल.
हेही वाचा…प्रसिद्धीसाठी कायपण! विमानतळावरील कन्व्हेयर बेल्टवर झोपली तरुणी अन्… Viral Video पाहून नेटकरी हैराण
व्हिडीओ नक्की बघा…
त्यानंतर भट्टीत भाजून घेतलेलं क्रिम रोल बाहेर काढून घेतले आहेत. त्यानंतर दुसरीकडे मशीनच्या सहाय्याने क्रिम तयार करून घेतली जात आहे. त्यानंतर भट्टीत भाजून घेतलेल्या रोलला क्रिमने सजावट केली जात आहे. त्यानंतर बेकरीत विक्रीसाठी हे क्रिम रोल ठेवण्यात आले आहेत; जे पाहून तुमच्याही तोंडाला नक्कीच पाणी सुटेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ अभिषेक या फूड ब्लॉगरने @thefoodiehat या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून लहानपणी आवडीने क्रिम रोल खाणाऱ्या त्या प्रत्येक नेटकाऱ्याने “आम्ही आजही हा क्रिम रोल आवडीने खातो” ; असे कमेंटमध्ये नमूद केलं आहे. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.