Video Shows Little Boy Dressed Up As Dada Kondke : ज्येष्ठ मराठी अभिनेते-चित्रपट निर्माते दादा कोंडके यांनी महाराष्ट्राला खळखळून हसवले. मराठी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका प्रचंड लोकप्रिय झाल्या. दादा कोंडके यांचे असे किती तरी किस्से, गोष्टी, कथा, दंतकथा, विनोद आणि त्यांच्या चित्रपटातील लोकप्रिय गीत संगीत, नृत्ये आदी गोष्टी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्याचबरोबर दादा कोंडके म्हटले की, डोळ्यासमोर येतो तो त्यांचा पोशाख; पांढरी टोपी, हाफ पँट आणि पँटचा लटकणारा नाडा आणि शर्ट. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये चिमुकल्याने दादा कोंडकेचा लूक रिक्रिएट केला आहे.

व्हायरल व्हिडीओ (Video) कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही, पण एका चिमुकल्याने दादा कोंडकेचा लूक रिक्रिएट केला आहे. स्टेजवर डान्स करण्यासाठी चिमुकल्याने पांढरी टोपी, हाफ पँट आणि पँटचा लटकणारा नाडा आणि शर्ट, डोक्याला आणि कानाला पांढरा टिक्का असा अगदी हुबेहूब लूक केलेला दिसतो आहे. मात्र, चिमुकला प्रेक्षकांना बघून घाबरला आहे आणि व्हिडीओच्या सुरुवातीला शर्टाने नाक पुसताना दिसतो आहे. एकदा बघाच चिमुकल्याचा मजेशीर व्हिडीओ.

व्हिडीओ नक्की बघा…

येवढ्या टेंशन मद्धे स्टेप विसरला नाही …

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की प्रेक्षकांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे चिमुकला घाबरून रडण्यास सुरुवात करतो. पण, त्याला डान्ससुद्धा करायचा असतो. कारण – चिमुकल्याने डान्ससाठी प्रचंड मेहनत केलेली दिसते आहे. तो रडत-रडत डान्स करत असला तरीही डान्सची एकही स्टेप तो विसरला नाही आहे. डान्स करताना हावभाव सगळेच देतात, पण या चिमुकल्याने घाबरून, वैतागून डान्स स्टेप्स केल्या आहेत; जे पाहून सगळेच पोट धरून हसताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ @wonderful_memories12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘घाबरून वैतागलेला दादा कोंडके…’ ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून, ‘एवढं रडतोय, तरीपण स्टेप विसरला नाहीः, येवढ्या टेंशनमध्ये स्टेप विसरला नाही… भावाने मनापासून प्रॅक्टिस केली होती… १ नं भावा, हाडाचा कलाकार आहे. काही असो, स्टेप विसरला नाही, पार्टनर मनासारखा नव्हता म्हणून रडतोय तो, जबरदस्तीने नाचायला लावलेला दादा कोंडके’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केलेल्या दिसत आहेत.