Priyanka Chopra Reacts On Little Boy’s Video: भेंडी ही भारतीय घरांमध्ये सगळ्यात जास्त बनवली जाणारी भाजी, असं म्हणायला हरकत नाही. भेंडीची भाजी बनवण्याची प्रत्येक आईची एक वेगळी स्टाईल आहे. कोणी अगदी साधी, तर कोणी भरलेलल्या भेंडीची भाजी बनवतो. जसा भेंडी खाणारा मोठा चाहतावर्ग आहे, तसा मिळमिळीत भेंडी खाण्यापासून पळ काढणारीही काही माणसं आहेत. पण, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका चिमुकल्यानं त्याचं भेंडीच्या भाजीवरील प्रेम व्हिडीओत (Video) अगदी चोख मांडलं आहे. ते प्रेम पाहून बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही हा व्हिडीओ रिपोस्ट केला आहे.

नोएडामध्ये राहणारा छोटा चिकू सोशल मीडियावरील त्याच्या व्हिडीओंमुळे खूप प्रसिद्ध आहे. अलीकडेच त्याच्या बाबांनी त्याचा नवीन व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत, बाबा चिकूला विचारतात, “तुला सगळ्यात जास्त आवडणाऱ्या एखाद्या पदार्थाचे नाव सांग?” त्यावर चिकू, “भेंडीची भाजी-पोळी खायला आवडते”, असं म्हणतो. “भेंडीच्या भाजीबरोबर खायला काहीही असो पोळी असो, पराठा असो किंवा पुरी… भेंडी खायला मला खूप आवडते. मसालेदार भेंडीची चव म्हणाल तर…” असे म्हणून फ्लाइंग किसही देतो. हे सगळं पाहून चिकूचे बाबा काय म्हणाले व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…नातीला नवरीच्या रूपात पाहून आजीच्या डोळ्यांत आनंदाश्रू; VIRAL VIDEO तील ‘ती’ गोष्ट पाहून म्हणाल, ‘जगातलं सगळ्यात सुंदर नातं’

व्हिडीओ नक्की बघा…

प्रियांका चोप्रालाही आवडते भेंडीची भाजी?

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, चिकूला भेंडीची भाजी आवडते हे ऐकल्यावर चिकूचे बाबा म्हणतात, “मग आता तुम्हाला भेंडीच्या भाजीचे सँडविच, ज्यूस, बिस्कीट, मॅगी, असं बनवून देतो तेसुद्धा खाशील ना?” त्यावर चिकू हसत, “नाही बाबा नाही”, असे उत्तर देतो आणि या मजेशीर व्हिडीओचा शेवट होतो. हा व्हिडीओ चिकूचे बाबा @cheekuthenoidakid या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करतात आणि “भेंडीची भाजी इतकी चांगली आहे का? #bhindisquad”, असं सगळ्या भेंडीप्रेमींना विचारतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हायरल झाल्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रानेसुद्धा हा व्हिडीओ पहिला आणि तिच्या @priyankachopra या इन्स्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर रिपोस्ट केला आहे. तसेच “सेम. #bhindisquad आणि एक लाळ पडणारा इमोजीदेखील जोडला’, असा मजकूरसुद्धा स्टोरीमध्ये लिहिला. म्हणजेच प्रियांका चोप्रालाही भेंडीची भाजी खायला आवडते हे सिद्ध झालं. काही भेंडीची भाजी आवडणाऱ्या काही नेटकऱ्यांनीसुद्धा कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं, “मी माझं आयुष्य फक्त भेंडीची भाजी खाऊन जगू शकतो”, अशी कमेंटसुद्धा केली आहे.