Viral Video Shows Sellers Struggle : पैसा ही एक अशी गोष्ट आहे की, जो कमवण्यासाठी आपण दिवसातील जास्तीत जास्त वेळ खर्च करतो. पण, काही जणांना पैसे कितीही कमावले तरी समाधान मिळत नाही. तर काही माणसांना १० रुपये कमवले तरी अगदी सुखाची झोप लागते. त्यामुळे पैशांचा उपयोग व्यवस्थित करणे आणि त्याचे मूल्य समजणे फार गरजेचे आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, त्यामध्ये १० रुपयांची किंमत काय असते हे दाखविणारे एक दृश्य दिसते आहे.

व्हायरल व्हिडीओ विक्रेत्याचा आहे. हा छोटा व्यापारी बसमधून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांसाठी पाण्याच्या बाटली विकत होता. यादरम्यान एका प्रवाशाने त्याच्याकडे पाण्याची बाटली मागितली. पण, तितक्यात बस सुटली आणि विक्रेता पाण्याच्या बाटल्या खांद्यावर घेऊन बसमागून धावत सुटला. एवढेच नाही, तर वाऱ्याने प्रवाशाच्या हातून पैशांची नोट खाली पडली. पण, तरीही विक्रेत्याने धावत-पळत प्रवाशाच्या हातात पाण्याची बाटली पोहोचवली. त्यानंतर खाली पडलेली नोट तो उचलून घेतो.

१० रुपया साठी नहीं हो फक्त … (Viral Video)

अनेकदा बस, ट्रेन आणि लोकलमध्ये फेरीवाले प्रवाशांच्या गरजेच्या वस्तू विकताना दिसतात. त्यामध्ये पाण्याची बाटली, काही खायचे सामान आदी अनेक गोष्टी असतात. एखाद्या तरी प्रवाशाने त्यांच्याकडून सामान घेतले तरी त्यांचा दिवस समाधानकारक जातो. त्यामुळे या येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या बसच त्यांच्यासाठी उत्पनाचे स्रोत असतात. त्यामुळे या व्यापाऱ्यांकडून मिळणारे १० रुपयेसुद्धा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात; जे आज व्हायरल व्हिडीओद्वारे पाहायला मिळाले.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @panya_edits_001 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “सगळा खेळ हा कष्टाच्या जोरावर चालतो”, “१० रुपयांसाठी नाही हो, फक्त… ग्राहक म्हणजे भगवान हे त्याला माहीत आहे आणि दुसऱ्याची तहान भागवणे म्हणजे सर्वांत मोठे पुण्य हे त्याला माहीत आहे म्हणून पळतोय तो”, “खरं तर ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो ना तोच माणूस आयुष्याचा विजय करू शकतो खरं तर”, “व्हिडीओ खूप मनाला लागला. कारण- की संघर्ष एक अशी गोष्ट आहे माणसाला खूप काही शिकवते व घडवते आणि भावाचे सर्व स्वप्न पूर्ण होवो या संघर्षातून हीच भगवंत चरणी प्रार्थना करतो खूप मोठा हो भाऊ” आदी अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.