Janaab E Aali Dance Viral Video : हृतिक रोशन आणि डान्स हे समीकरणच आहे. लोकप्रिय असलेला बॉलिवूड स्टार हृतिक रोशन अभिनयासह त्याच्या डान्ससाठीही तितकाच ओळखला जातो. त्याच्या डान्स करण्याची स्टाईल, त्याची डान्सचा आनंद घेण्याची कला आणि जोश, उत्साह आणि स्टेप्स तर अगदी बघण्यासारख्या असतात.एकूणच किती कठीण डान्स स्टेप्स असो हृतिक रोशनअगदी सहजरित्या करुन दाखवतो. तर आज सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे; जो हृतिक रोशनच्या गाण्यावर डान्स करताना दिसला आहे.
ओडिशाच्या कटकमध्ये बदामबाडी येथील एका उच्च प्राथमिक शाळेत हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. काही शिक्षक बसले आहेत आणि संपूर्ण वर्गातील विद्यार्थ्यांसमोर मुलगा डान्स करतो आहे. हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ मधलं ‘जनाब ए अली’ गाण्यावर हा लहानसा विद्यार्थी डान्स करतो आहे. त्याच्या चार्मिंग डान्स स्टेप्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्ही पाहू शकता पूर्ण गाणं संपेपर्यंत विद्यार्थी एकही स्टेप्स चुकला नाही किंवा त्याचा जोश कुठेही कमी झालेला दिसत नाही आहे.
विद्यार्थी नाचताना त्याचे वर्गमित्र आणि त्याच्या शिक्षक सुद्धा त्याला प्रोत्साहन देत, गाणी गातात आणि टाळ्या वाजवून त्यांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने हुक स्टेप्सवर लक्ष केंद्रित करतो आहे. पूर्ण व्हिडीओ संपेपर्यंत अगदी हृतिक रोशनप्रमाणेच कुठेही तो चुकला नाही किंवा त्यांची एनर्जी सुद्धा कमी पडली नाही. त्यामुळे तुम्ही हा डान्स व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघाल एवढे तर नक्की. हृतिक रोशनच्या गाण्यावर भरवर्गात विद्यार्थ्याने कसा डान्स केला व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ बघण्यासाठी लिंकवर क्लिक करा…
-
हृतिक रोशनच्या गाण्यावर भरवर्गात केला डान्स! (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम / @devil_edixz )
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @devil_edixz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “तुझ्या डान्समुळे एकच रील १०+ पेक्षा जास्त वेळा सतत पाहिला”, “भावाची प्रत्येक स्टेपला एनर्जी अगदी बघण्यासारखी आहे”, “एवढा आत्मविश्वास आयुष्यात हवा”, “लिटिल हृतिक रोशन”, “एकदम जबरदस्त” , ” वाह काय डान्स केला आहेस” आदी कौतुक तर अनेक जण हृतिक रोशनला व्हिडीओच्या कमेंटमध्ये टॅग करताना दिसून आले आहेत.
