Video Shows Love Between Elephant And Owner : पाळीव असो किंवा भटके प्राणी, त्यांना आपल्याकडून केवळ प्रेम हवे असते. आपण खूप वेळ घरात दिसलो नाही की अस्वस्थ होणारे हे पाळीव प्राणी आपण घरात येताच आपल्याकडे धावून येतात आणि आपण त्यांच्या डोक्यावरून हात कुरवाळताच ते आनंदी होऊन जातात. तर रस्त्यावरच्या भटक्या प्राण्यांना दूध किंवा बिस्कीट खाऊ घातले तर ते दुसऱ्या दिवशी त्याच रस्त्यावर आपली आपुलकीने वाट पाहत असतात. यावरूनच समजते की, प्राण्यांना फक्त आपल्याकडून प्रेम हवे असते; तर आज हेच दृश्य दाखवणारा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

व्हायरल व्हिडीओत (Video) एक हत्ती आणि त्याचा सांभाळ करणारा माहूत दिसतो आहे. माहूत हातात काठी घेऊन उभा असतो. हत्ती आपल्या सोंडेने त्याच्या हातातील काठी घेण्याचा प्रयत्न करतो, हे पाहून माहूत काठी स्वतःच्या मागे लपवतो. पण, हत्ती आपले प्रयत्न सुरू ठेवून आपल्या सोंडेने माहूताच्या हातातील काठी घेऊन स्वतःच्या तोंडात पकडतो. माहूतसुद्धा काही क्षणासाठी विचारात पडतो की नक्की हत्तीला करायचे तरी काय आहे? तर नक्की हत्तीने पुढे काय केले व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत (Video) तुम्ही पाहिले असेल की, हत्तीचे माहूतावर भरपूर प्रेम असते. माहूताने आपल्याकडे पाहावे, आपल्याला वेळ द्यावा यासाठी तो खास गोष्ट करतो. हत्ती माहूताच्या हातातील काठी आपल्या सोंडेत पकडतो आणि तोंडात ठेवतो. त्यानंतर पुन्हा सोंडेने माहूताचा हात ओढत स्वतःजवळ आणतो आणि डोक्यावरून हात फिरवण्यासाठी त्याला मायेने कुरवळण्यासाठी नकळत इशारा देतो. माहूतसुद्धा आपल्या हत्तीवर माया दाखवताना दिसतो; जे पाहून तुमचेही मन नक्कीच भरून येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यांना फक्त तुमचे प्रेम हवे

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @_adultgram या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ‘त्यांना काहीही नको आहे, त्यांना फक्त तुमचे प्रेम हवे आहे’; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. या व्हिडीओने नेटकाऱ्यांचेसुद्धा मन जिंकले आहे. ‘हत्तीला आपल्या माहूतावर किती प्रेम आहे, केवढा प्रेमळ हत्ती आहे, हा व्हिडीओ पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले, तर काही जण हत्तीला स्वातंत्र्य हवे आहे’ असे व्हिडीओच्या कमेंटमध्ये म्हणताना दिसत आहेत.