सध्या जगभरात चर्चा आहे युक्रेन आणि युक्रेनच्या लोकांकडून रशियाला केला जाणारा कडवा विरोध. रशियाने युक्रेनविरोधात युद्धाची घोषणा करुन पाच दिवस लोटले आहेत. मात्र बलाढ्य रशियाला युक्रेनच्या लष्कराबरोबरच सर्वसामान्य व्यक्तीही विरोध करत आहेत. बरं हा विरोध केवळ शक्तीने केला जात नसून युक्तीने आणि तितक्याच हलक्यापुलक्या पद्धतीने म्हणजेच विनोदी पद्धतीनेही केला जातोय. असाच एक प्रसंग समोर आलाय.

नक्की पाहा >> Video: आजींनी रशियन सैनिकाला भरचौकात झापलं; नंतर त्याच्या हातावर सूर्यफुलाच्या बिया टेकवत म्हटल्या, “या खिशात ठेव म्हणजे…”

झालं असं की देशाची राजधानी असणाऱ्या किव्ह शहराजवळ रशियन लष्कराच्या रणगाड्यामधील इंधन संपल्याने तो बंद पडला. रस्त्याच्या मधोमध रणगाडा बंद पडल्याने रशियन सैनिक रस्त्यावर उतरुन उभे होते. तितक्यात एक युक्रेनचा नागरिक गाडीने जात असताना तिथे जाऊन थांबला आणि त्याने रशियन सैनिकांना एक ऑफर दिली. ही ऑफर होती त्यांना रशियात परत नेऊन सोडण्याची.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये युक्रेनमधील एक कारचालक रस्त्यात बंद पडलेल्या गाडीच्या जवळ येऊन थांबताना दिसतो. नंतर तो रशियन सैनिकांची चौकशी करत तुमचा रणगाडा बंद पडलाय का असं त्यांना विचारतो.

नक्की वाचा >> Ukraine War: “चला त्यांना नरकात…”; देशात घुसलेल्या रशियन सैन्याची दिशाभूल करण्यासाठी युक्रेन सरकारचं अनोखं आवाहन

या चौकशीनंतर त्या युक्रेनच्या व्यक्तीला उत्तर देताना रशियन सैन्याने रणगाड्यामधील इंधन संपल्याची माहिती दिली. त्यावर तो चालक हसला आणि त्याने, “मी तुम्हाला परत रशियात सोडून येऊ का?”, असा प्रश्न विचारला. त्याचा हा प्रश्न ऐकून सर्वजण हसू लागले. सोशल मीडियावरील माहितीनुसार या चालकाने सैनिकांना नक्की कुठे जायचंय असं विचारलं. त्यावर सैनिकांना नेमकं ठिकाण सांगता आलं नाही. तेव्हा या चालकाने तुम्ही देशाची राजधानी असणाऱ्या किव्ह शहराच्या वाटेवर आहात असं सांगितलं. त्यानंतर या रशियन सैनिकांनी युद्धाची स्थिती काय आहे याबद्दल विचारपूस केली. त्यावर चालकाने “युक्रेन जिंकतोय आणि रशियन शरण येतायत,” असं सांगितलं. यामधून त्याला समोरच्या सैनिकांना तुम्ही सुद्धा शस्त्र टाकून द्या असा संदेश द्यायचा होता.

नक्की वाचा >> Ukraine War: शिवसेनेनं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांची मोदींशी केली तुलना, म्हणाले, “त्यांची छाती ५६ इंचाची तर जगाचे नेते मोदींनी…”

नक्की पाहा हे फोटो >> Photos: सैन्यासोबत युद्धग्रस्त देशात फिरणारा, पळून जाण्यास नकार देणार अन्…; लोक म्हणतात, “हाच युक्रेन युद्धाचा खरा हिरो”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही एका आजींनी रशियन सैनिकाला भर चौकात झापल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तुमचं इथं काय काम आहे अशी विचारणा करतानाच या आजींनी सैनिकाच्या हातात सूर्यफुलाच्या बिया दिल्या होत्या. या बिया खिशात ठेवं, म्हणजे तू मरशील आमच्या देशात तेव्हा त्यातून सूर्यफुलाची रोपं उगवतील असं या आजींनी सैनिकाला सांगितलं होतं.