Video Shows Worker Desi Jugaad : उंचच उंच इमारती, टॉवर, विविध मॉल यांच्या वेगवेगळ्या रचना पाहून आपण थक्क होऊन जातो आणि हे सर्व कसे बांधले गेले असेल, असा प्रश्नही आपल्या मनात येतोच. पण, बांधकाम क्षेत्रातील कामगार यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात. अनेकदा त्यांना उंच इमारतीचे बांधकाम करताना पाहून आपल्याही मनात भीती येते. पण, आज सोशल मीडियावर या कामगाराने भलताच जुगाड केला आहे. तो जुगाड पाहून तुम्हाला काळजी तर वाटेलच आणि तुम्ही पोट धरून हसालही.
बांधकाम क्षेत्रातील कामगार एका इमारतीचे काम करत असतो. यादरम्यान कामगार खूप उंचावर बसलेला असतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेण्यासाठी की काय तो एक जबरदस्त जुगाड करतो. त्याने सळीला एक दोरी बांधलेली असते. तसेच दुसरे टोक फास लावताना गळ्यात दोरी घालतात अगदी त्याचप्रमाणे स्वतःच्या गळ्यात या कामगाराने घातले आहे; जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. एकदा बघाच हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ…
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
https://www.instagram.com/reel/DIhBcSfyYiv/?igsh=emdmZHBneXhwazFo
या जुगाडाला काय नाव देऊ (Viral Video)
बांधकाम क्षेत्रातील कामगारांना उंचावर जाऊन काम करावे लागते. त्यांना त्या स्थितीत पाहून आपल्याही पोटात गोळा येतो. अर्थात, त्यांनाही भीती वाटत असणे साहजिकच आहे; पण त्यांना उदरनिर्वाहासाठी जीवावर उदार होऊन काम करावेच लागते. तुम्ही पाहिले असेल की, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कामगाराने गळ्यात दोरी घातली आहे आणि बाजूला असणाऱ्या सळीला ती बांधली आहे. तिथे उपस्थित दुसऱ्या कामगाराने हे दृश्य पाहिले आणि मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करून घेतला. कामगाराने केलेला हा जुगाड हास्यास्पद असला तरीही त्याच्या जीवासाठी तो धोकादायक आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @atoz.naughty या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “अरे सेफ्टी आहे की गळ्याला फास”, “त्याचं डोकं सुटीवर गेलं आहे बहुतेक”, “सेफ्टी फर्स्ट”, “या जुगाडाला काय नाव देऊ” आदी अनेक मजेशीर कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. चुकूनसुद्धा बांधकाम करताना तोल गेला, तर त्याने गळ्यात घालून घेतलेल्या दोरीमुळे त्याचा जीवही जाऊ शकतो, अशी भीती तुमच्याही मनात येईल एवढे तर नक्की.