Viral Video: डान्स, संगीत, अभिनय यांसारख्या कला क्षेत्रात आपलं नाव मोठं करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. सोशल मीडियावर लाखो युजर्स अशा विविध कला सादर करीत असतात, ज्यातील काही मोजकेच लोक लोकप्रिय होतात. या कला सादर करणाऱ्यांमध्ये अगदी लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक वयोगटातील लोकांचा समावेश असतो. सध्या सोशल मीडियावर एका डान्स स्पर्धेतील चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
लहान मुलांचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहतो, ज्यात ती मुलं बिनधास्त स्टेजवर डान्स करताना किंवा गाणं गाताना, अभिनय सादर करताना दिसतात. चिमुकल्यांच्या या व्हिडीओंना लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात एक लहान चिमुकली सुंदर डान्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोठ्या स्टेजवर खूप सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी ती चिमुकली ‘पूरा लंदन ठुमकदा’ या गाण्यावर डान्स करत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील गोड हावभाव आणि प्रत्येक डान्स स्टेप युजर्सचे लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adorable_aanyaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत नऊ लाखाहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “खूप सुंदर डान्स” आणखी एकाने लिहिलेय, “मस्त” आणखी एकाने लिहिलेय, “खूप क्यूट नाचली ही.”