Viral Video: सोशल मीडियाआधीचे जग आणि सोशल मीडियानंतरच्या जगात जमीन-आसमानाचा फरक पाहायला मिळतो. पूर्वी लहान मुलं घर, शाळा आणि मित्रांबरोबरचे खेळ यात मग्न असायचे. परंतु आताची पिढी घर, शाळा आणि सोशल मीडियामध्ये मग्न झालेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आकर्षित करेल अशाप्रकारचे नवनवीन कटेंट असतात. ज्याला कितीही नाही म्हटलं तरी अनेकजण आपल्या दिवसातील जास्तीत जास्त वेळ त्यावर घालवतात. परंतु सोशल मीडियामुळे अनेकांचे आयुष्यही बदलू लागले आहे. यामुळे अनेक कलाकारांच्या केलेला वाव मिळत आहे.
सोशल मीडियावर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींचे मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी गाणं गाताना दिसतं, तर कधी कोणी अभिनय किंवा डान्स करताना दिसतं. यापैकी काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात; ज्यावर लाखो व्ह्युज आणि लाइक्सही मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक मुलगा अभिनय करताना दिसतोय. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा ‘आंखों से तुमने क्या कह दिया’, या गाण्यावर अभिनय करत आहे. यावेळी त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही त्याचं कौतुक कराल. सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @vardaan_funpitara या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत आठ लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय “काय अभिनय करतोय हा” आणखी एकाने लिहिलेय, “एकच नंबर भावा” आणखी एकाने लिहिलेय, “काय एक्सप्रेशन्स आहेत.”