Viral Video: हल्लीच्या लहान मुलांमध्येही सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण असलेले पाहायला मिळते. नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता एका चिमुकलीचा डान्स व्हायरल होत आहे.

सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल झालेले पाहायला मिळतात. कधी बाप्पाच्या मूर्तीचे तर कधी गौराईचे, डोकेरेशनचे आणि डान्सचे व्हिडीओ व्हायरल होतात. आताही असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक चिमुकली एका गणेश चतुर्थी उत्सवात नाचताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘एक नंबर तुझी कंबर’ या गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही तिचे कौतुक कराल. तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांकडून पसंती दिली जात आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवरील @cutiepie_riva या अकाउन्टवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत सहा मिलियन व्ह्यूज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “खूप छान नाचली”. तर दुसऱ्याने लिहिलंय की, “मोठी होऊन आई-वडिलांचे नाव मोठे करणार”. तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूपच क्यूट आहे ही”