Viral Video: सोशल मीडियावर प्रत्येक गोष्टींचा ट्रेंड सतत बदलत असतो. मग ती गाणी असो किंवा एखादा डान्स व्हिडीओ, यावर सतत विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रिल्स बनवताना दिसतात. दरम्यान, आता या एका चिमुकलीचा सुंदर डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात, अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांच्या नेहमीच तोंडपाठ असते. सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील अशाच एका लहान गोड मुलीचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यावर ती ‘लगान’ चित्रपटामधील ‘राधा कैसे ना जले’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका लहान मुलीने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला असून यावेळी ती ‘राधा कैसे ना जले’या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या चिमुकलीचा हा गोड डान्स तुम्हालाही आवडेल. या व्हिडीओतील चिमुकलीच्या चेहऱ्यावरील हावभावाचेही अनेकजण कौतुक करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adorable_aanyaa या अकाउंटवर शेअर केला असून यावर आतापर्यंत जवळपास ७५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर ३ मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूप गोड’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘छोटी राधा’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘व्वा काय नाचली.’ तर इतर अनेक जण चिमुकलीचं कौतुक करताना दिसत आहेत.