Viral Video: आजकालच्या लहान मुलांमध्ये सोशल मीडियाप्रति खूप आकर्षण आहे.नवनवीन गाणी, चित्रपट आणि त्यातील डायलॉग्ज मुलांना तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रति मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलंदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली कला सादर करताना दिसतात. आतापर्यंत आपण अनेक व्हायरल व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आता अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ खूप चर्चेत आलाय, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.

सध्या सोशल मीडियावर ‘स्वप्नात आली राणी मुखर्जी’, ‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’ ही नवीन मराठी गाणी खूप चर्चेत आहेत, ज्यावर लाखो युजर्स रील्स बनवताना दिसत आहेत. आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकली ‘तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी’ या मराठी जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्सही अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी’ या जुन्या मराठी गाण्यावर हटके स्टाईलमध्ये डान्स करताना दिसतेय. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि डान्स स्टेप्स तुम्हीही टक लावून पाहत राहाल. या व्हिडीओमध्ये तिचे बाबा देखील तिला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Adira Jayshri Vinayak Chavan (@adira_chavan)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @adira_chavan या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास हजारो व्ह्युज आणि लाइक्स आल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप सुंदर नाचलीस.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “चिमुकलीचे एक्स्प्रेशन्स कमाल आहेत.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “खूप सुंदर, मस्तच.”