Viral Video: सोशल मीडियावर एकमेकांच्या विरुद्ध भांडायला सज्ज असणारे नेटकरी यावेळेस मात्र एकत्र आले आहेत. निमित्त काय तर या इवल्याश्या जीवाने हात जोडून केलेली विनवणी. अत्यंत भावुक असा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. पाणी वाचवा, जल हेच जीवन अशा घोषणा आजवर आपण अनेकदा ऐकल्या असतील पण हाच संदेश एका मुक्या प्राण्याने दिलेला पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. माणसामुळे पाण्याचा सर्वात जास्त अपव्यव होत असला तरी त्याचा फटका मात्र बेघर प्राण्यांनाच जास्त बसतो, हेच वास्तव दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक खारुताई दोन व्यक्तींचा पाठलाग करत येते, जेव्हा यातील एका मुलीचे लक्ष तिच्याकडे जाते तसे ते दोघे थांबतात, तेव्हा चक्क दोन्ही पायांवर उभी राहात खारुताई पुढच्या दोन पायांनी नमस्कार करून कसलीतरी विनवणी करते. सुरुवातीला तिला काय हवंय हे या दोघांना कळत नाही पण तिची नजर त्या व्यक्तीच्या हातातील पाण्याच्या बॉटलकडे असते. मग ही व्यक्ती त्या खारुताईला पाणी पाजण्यासाठी बॉटल पुढे करते आणि घोटभर पाणी पिऊन खारुताई निघून जाते.

भारतीय वन सेवेतील अधिकारी सुसंता नंदा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. (Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हायरल व्हिडीओ

अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओला ४२ लाख व्ह्यूज व लाखो लाईक्स आहेत. यावर कमेंट करून अनेकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर अनेकांनी त्या खारुताईला पाणी पाजणाऱ्या जोडप्याचंही कौतुक केलं आहे.