तुम्ही कधी ‘कुकर कॉफी’ घेतली आहे का?; रस्त्यावरील विक्रेत्याचा VIDEO VIRAL एकदा पाहाच…

तुम्ही कॉफी प्रेमी आहात का? मग या नव्या प्रकारच्या कॉफीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. कॉफीचा हा देसी प्रकार नेटकऱ्यांच्या पसंतीला पडतोय.

Cooker-Coffee-Viral-Video
(Photo: Instagram/ eatthisagra )

तुम्ही कॉफी प्रेमी आहात का? जगभरामध्ये चहाप्रमाणेच कॉफी पिणाऱ्यांचीही संख्या जास्त आहे. तुम्हाला आपल्या आसपासही कॉफी प्रेमी नक्कीच आढळतील. याच कारणामुळे जगभरात ठिकठिकाणी आपल्याला कॉफी शॉप आणि कॅफे पाहायला मिळतात. लोकांच्या आवडीनिवडीनुसार येथे वेगवेगळ्या प्रकारची कॉफी उपलब्ध असते. बहुतांश जण फ्रेश वाटण्यासाठी कॉफी पितात. जर तुमचा दिवस सुद्धा तर कॉफीशिवाय सुरू होत नसेल तर हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

आतापर्यंत तुम्ही कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी, कॅपेचिनो, अमेरिकानो असे कॉफीचे वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिले असतीलच. पण तुम्ही कधी कुकर कॉफीची चख चाखलीय का ? होय, कॉफीचं हे नाव ऐकून सुरूवातीला तुम्हाला वाटेल हा काय प्रकार आहे ? कॉफीचा हा देसी प्रकार नेटकऱ्यांच्या पसंतीला पडतोय. एका रस्त्यावरील विक्रेत्याचा कुकर वापरून गरमागरम कॉफी बनवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ‘कुकर कॉफी’ हे नाव ऐकूनच अनेकांचं डोकं चक्रावून गेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एका प्रेशर कुकरध्ये कॉफी नक्की कशी बनवली जात असेल? तसंच त्याची चव तरी कशी लागत असणार ? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, सायकलवर कॉफी विकणारा एक माणूस सुरूवातीला एका भांड्यात कॉफीसाठी लागणारं दूध, पाणी, कॉफी पावडर, साखर आणि क्रीम मिक्स करतो. मग भांड्यात तयार केलेल्या कॉफीला कुकरच्या शिटीतून येणाऱ्या गरम वाफेवर मिक्स करतो आणि तयार झालेली कुकर कॉफी सर्व्ह करतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : आधी पोटोबा आणि मग…, भूकेने व्याकूळ ड्रायव्हरने कार्डमधील माहिती लीक होण्याची जोखीम पत्कारली

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पुन्हा चर्चेत आली ‘पाकिस्तानी गर्ल’; दिलखेचक स्माईलने घायाळ करणारा नवा VIDEO VIRAL

एका फूड ब्लॉगरने त्याच्या eatthisagra नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ मध्य प्रदेशमधल्या ग्वालियारमधला असल्याचं सांगण्यात आलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video street vendor makes coffee in cooker trending video leaves internet google trending video prp

ताज्या बातम्या