Viral video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओही व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात एखादी गोष्ट व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.ट्रेनमधून प्रवास करताना तिकीट काढूनच प्रवास करायचा हा नियम सगळ्यांनाच माहीत आहे. विनातिकीट प्रवास केल्यावर दंड भरावा लागतो. ट्रेनमध्ये विनातिकीट प्रवास केला, तर टीसी येण्याची सगळ्यांनाच भीती असते. रेल्वेमध्ये TTE चं काम प्रवाशांच्या तिकिट तपासणं आणि विनातिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून दंड वसूल करणं असतं. मात्र सध्या समोर आलेला प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल. यामध्ये एका टीसीनं एका गरीब प्रवाशासोबत असं काही केलंय की पाहून तुम्हालाही संताप येईल.
टीसीचं काम तिकीट तपासणे आहे. पण जर टीसीचं नियमांचं उल्लंघन करत असतील, तर तुम्ही काय म्हणाल? होय, असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका टीसीनं दंडाच्या रकमेपेक्षा जास्त पैसे घेत प्रवाशाला लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक टीसी ट्रेनमध्ये तिकीट तपासताना दिसत आहे. यावेळी तो एक प्रवशाला पकडतो आणि दंडाची रक्कम वसूल करण्याएवजी थेट त्याच्याकडे असलेले सगळे पैसे हिसकावून घेतो. यानंतर हा गरीब व्यक्ती हात जोडून टीसीला एवढे पैसे घेऊ नका घेऊ नका अशी विनंती करत आहे. मात्र या टीसीला अजिबात त्याची दया येताना दिसत नाही.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आहेत. एकानं म्हंटलंय, “हजारो रुपये कमावणारा माणूस ३०० रुपये कमावणाऱ्या मजुराकडून लाच घेतो तेव्हा ते वाईट वाटते.”, तर दुसरा म्हणतो, “लोक पैशासाठी काहीही करतील, ज्याने कष्टाने कमावलेले पैसे गमावले त्याची झोप उडते.” तर आणखी एकानं, “लाच एकटी येत नाही; देणाऱ्याचे शाप, सक्ती, दुःख, ताण आणि काळजी हे सर्व याच्याशी जोडलेले असतात.”