सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक माणूस मोकाट कुत्र्याला विनाकारण मारहाण करताना दिसत आहे. मात्र, या कुत्र्याच्या मदतीसाठी आणि मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अद्दल घडवण्यासाठी चक्क एक गाय धावून आल्यातं पाहायला मिळतं आहे. शिवाय यासाठीच आम्ही गाईला आईसमान मानतो अशा कमेंट नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केल्या आहेत.

जगात दोन स्वभावाची माणसं आढळतात, एक जी मुक्या प्राण्यांची सेवा करणारी त्यांना खायला दातोत, तर दुसरी विनाकारण मुक्या प्राण्यांवर अत्याचार करणारी त्यांना त्रास देणारी. मात्र, मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देणाऱ्यांना अनेकदा अद्दल घडल्याचे व्हिडीओ आपण पाहिले असतील. शिवाय जैसी करनी वैसी भरनी असा अनुभव आल्याचं देखील आपण पाहिलं आहे.

हेही पाहा- महिलांचा करेक्ट कार्यक्रम! भलेमोठे गवताचे बंडल रोबोप्रमाणे क्षणात लोकलमध्ये चढवले; Video पाहून व्हाल थक्क

तरिदेखील अनेकांची खोड्या काढण्याची सवय जात नाही. सध्या अशाच एका निर्दयी माणसाचा मोकाट कुत्र्याला विनाकारण त्रास देतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो माणूस कुत्र्याचे दोन्ही कान पकडून त्याला निर्दयीपणे वरती उचलताना दिसतं आहे. कानाला पकडून उचलल्यामुळे कुत्र्याला तीव्र वेदना होतायत आणि तो जोरजोरात ओरडताना दिसत आहे. हे दृश्य पाहून तुम्हालाही या व्यक्तीचा राग येईल.

कुत्र्याच्या मदतीसाठी गाय धावली –

मात्र, तो व्यक्ती कुत्र्याला मारहाण करत असताना कुत्र्याच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही, त्याचवेळी एक गाय कुत्र्याच्या मदतीसाठी धावून येते आणि ती आपल्या शिंगांनी त्या माणसावर हल्ला करते आणि एका झटक्यात त्याला उचलून फेकते. त्यामुळे तो व्यक्ती कुत्र्याला सोडून देतो. तर मुक्या प्राण्याचा त्रास मुक्या प्राण्यालाच कळतो असं नेटकरी म्हणत आहेत. शिवाय कुत्र्याच्या मदतीसाठी धावून आलेली गाय नव्हे तर मुक्या प्राण्यांची माय आहे अशाही कमेंट लोकं करत आहेत.

हेही पाहा- Video: क्षणात होत्याचं नव्हतं झालं! प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या टीसीच्या डोक्यावर पडली विजेची तार अन्

हा व्हिडिओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला असून या व्हिडीओला त्यांनी ‘कर्म’ असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय ‘जसं कर्म तसं फळ’ भेटतेचं अशा कमेंट काही लोकांनी केल्या आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आत्तापर्यतं त्याला ५ लाखाहून अधिक लोकांनी पाहिला आहे.