Viral Video: अनेकदा सोशल मीडियावर अपघाताचे किंवा भांडण, मारहाणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो; जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर अनेकदा घरगुती भांडणाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. सासू, सून, नवरा-बायको यांच्यातील छोट्या-मोठ्या भांडणाच्या अनेक घटना सोशल मीडियावर दिसतात. नवरा आणि बायको म्हटलं तर वाद हे होतातच. परंतु, कधी कधी या छोट्या छोट्या भांडणातूनच मोठ्या वादाचा भडका उडतो. रोजच्या वादाला कंटाळून हत्या किंवा आत्महत्येचं पाऊल उचललं जातं. यामध्ये बऱ्याचदा दोघांपैकी एकाचा जीव जातो. या सर्व गोष्टी होऊ नये म्हणून अनेकदा दोघांना वेगळं होण्याचा सल्ला दिला जातो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरा-बायकोमध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला असून हा वाद कायमचा मिटवण्यासाठी मुलीची आई तिच्या घरी येते आणि मुलीला नातीसह माहेरी चल असं म्हणते.

यावेळी ती म्हणते, “जे होईल ते होईल.. उचल मुलीला आणि माझ्याबरोबर चल… तुला नवरा पाहिजे? असले छप्पन नवरे करून देईन तुला… माझा जीव गेला तरी तुला इथे ठेवणार नाही, पोरीला घे आणि माझ्याबरोबर चल.”

यावेळी व्हिडीओमध्ये एका पुरुषाचा आवाज येतो, तो म्हणतो, “तुम्ही असं घेऊन जाऊ शकत नाही.”

यावर मुलीची आई म्हणते, “काय गं तू येऊ शकत नाहीस? मी नेतेय ना तुला, तुला जगाशी काय घेणं देणं आहे, मला माहिती आहे रात्री काय झालं ते.”

या घरगुती भांडणाचा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत असून नेटकरी यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sandip_jangam_5 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर नेटकरीही अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. एकानं लिहिलंय, “अशी आई पाहिजे, नाहीतर वैष्णवी हगवणेसारखी हालत होईल” दुसऱ्यानं लिहिलंय, “मेलेल्या पोरीपेक्षा नवरा नसलेली पोरगी बरी”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “म्हणून घटस्फोट होतात, मुलींच्या आया संसारात ढवळा ढवळ करतात.”