सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही. त्यासाठी कित्येकदा लोक स्वत:चा जीव धोक्यात टाकतात. कोणी रेल्वेच्या रुळावर स्टंट करते तर कोणी रेल्वेमध्ये स्टंट करताना दिसतात. त्यामुळे अनेकांचा जीव गमावला आहे पण तरीही अशा लोकांना काही फरक पडत नाही. सध्या उत्तराखंडच्या अल्मोडा येथे घडलेले अशीच एक घटना समोर आली आहे. व्हिडीओमध्ये ३ तरुण एवढ्या वेगात कार चालवत होते की ती थेट नदीमध्ये शिरली.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक कार नदीमध्ये जवळपास बुडाली आहे. तर तीन तरुण जीव वाचवण्यासाठी गाडीवर चढले आहे. स्थानिक लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले त्यामुळे त्यांचा जीव वाचला.

हेही वाचा – भररस्त्यात डोक्यावर मोठा ब्रेडचा ट्रे ठेवून सायकल चालवतोय ‘हा’ व्यक्ती, तरुणाचा बॅलन्स पाहून व्हाल थक्क!

या तरुणांना रामगंगा नदीच्या किनारी कार थांबवायची होती. नदी ओलांडण्यासाठी तरुणांनी काहीही विचार न करता पाण्यामध्ये गाडी उतरवली. सुरुवातीला तरुणांना वाटले की सहज गाडी पार करता येईल. पण जसजशी गाडी पुढे जाऊ लागली तस कशी ती नदीमध्ये बुडू लागली. एक वेळ अशी आली की, तरुणांना आपला जीव वाचवण्यासाठी गाडीच्या वर चढावे लागले. दरम्यान स्थानिक लोकांनी दोरखंडाच्या मदतीने तरुणांना नदीच्या प्रवाहाच्या बाहेर काढले तेव्हा त्यांचा जीव वाचला. नदीत बुडालेल्या या गाडीचे काय झाले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. पण या गाडीतील तिन्ही तरुणांना वाचवण्यात यश आले आहे.

हेही वाचा – औषध विक्रेत्याने चुकून दिल्या गर्भपाताच्या गोळ्या, आईने तिच्या जुळ्या मुलांना गमावले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग अनावर

व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना राग व्यक्त केला. एक व्यकी म्हणाला, नुकसानभरपाईच्या पैशातून थार खरेदी करू शकता पण अक्कल आणि संस्कार नाही. तर दुसरा व्यक्ती म्हणाला, या लोकांना वाचवायचे नव्हते. त्यांना नदीत वाहून जाण्यासारखेच काम केले आहे. तर तिसरा व्यक्ती म्हणाला की, आपल्या देशात अनेक मुर्ख आहे ज्यापैकी तीन या व्हिडीओमध्ये दिसत आहे.