VIRAL VIDEO : कॉलेजमध्ये सॅक-बेड आणि गोधडी घेऊन आली ही विद्यार्थीनी; पाहून प्रत्येकजण हैराण

कॉलेजमध्ये गादी आणि गोधडी घेऊन आलेल्या या मुलीला पाहून सारेच जण हैराण झाले आहेत. नेमकं हे काय प्रकरण आहे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यासाठी हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

mattress-bedding-into-a-lecture-hall-viral-video
(Photo: Youtube/ Random)

थंडीची चाहूल लागली आहे आणि तसा माहोलही निर्माण झाला आहे. अशा गुलाबी थंडीत उबदार चादरीत मनसोक्त झोपायला प्रत्येकालाच आवडते. थंडीच्या दिवसात सकाळी कितीही उठण्याचा प्रयत्न केला तरी उठावेसे वाटत नाही. त्यातून असा आराम सोडून सकाळी कॉलेजला आणि कामावर जायचं म्हणजे अनेकांसाठी शिक्षाच. पण त्यावर एका विद्यार्थीनीने एक मजेदार सोल्यूशन शोधलं आहे. ही विद्यार्थीनी चक्क गादी आणि गोधडी घेऊनच थेट कॉलेजमध्ये लेक्चरसाठी गेली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकाला हसू आवरणं अवघड होऊ लागलंय. हा व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमधली विद्यार्थीनी ब्रिटनमधील असून सध्या तिची बरीच चर्चा सुरूये. या विद्यार्थीनीने सकाळच्या लेक्चरला हजेरी लावण्यासाठी केलेला पराक्रम कळल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही विद्यार्थिनी तिची सॅक-बेड घेऊन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये पोहोचली. विद्यार्थीनीचं हे विचित्र वागणं पाहिल्यानंतर सर्वांचाच गोंधळ उडाला. मात्र, या मुलीने असं का केलं त्यामागचं कारणंही गमतीशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे प्रकरण.

मॅग्डा नावाच्या मुलीने टिकटॉकवर तिच्या बॅचमेटच्या या विचित्र कृत्याचा व्हिडीओ अपलोड केला आहे. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. मॅग्डाने सांगितलं की, कॉलेजमध्ये सकाळी लवकर लेक्चर्स सुरू व्हायची. यामुळे ती वर्गातच झोपी जायची. अशा स्थितीत तिला एक कल्पना सुचली. घरातली गादी आणि गोधडी घेऊन ती थेट युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पोहोचली. आता या विचित्र कल्पनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांना हैराण करून सोडतोय.

आणखी वाचा : ट्रॅफिक पोलिसाने रस्त्यावरील सर्व गाड्या थांबवल्या आणि मांजरीला रस्ता मोकळा करून दिला…; पाहा VIRAL VIDEO

आणखी वाचा : ओळखा पाहू या टोपीचा रंग कोणता ? हिरवा की तपकिरी? रंग बदलणाऱ्या टोपीचा VIDEO VIRAL; तुम्हाला काय दिसतंय ?

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगी सकाळी नऊ वाजता लेक्चरला हजर राहण्यासाठी विचित्र पद्धतीने युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये पोहोचताना दिसतेय. व्हिडीओमध्ये या मुलीने ट्रॉलीमध्ये आपली सॅक-बेड आणली होती. युनिव्हर्सिटीमध्ये पोहोचण्यासाठी या मुलीला खूप आळस येत होता. तिला तिची झोप खूप आवडायची आणि तिचं लेक्चरही चुकवायचं नव्हतं. जर आपण आपला सॅक-बेडच वर्गात आणला तर कदाचित आपल्यालाही झोपण्याची संधी मिळेल आणि लेक्चरही चुकणार नाही.

विशेष म्हणजे या मुलीने चक्क लेक्चर हॉलमध्येच अंथरुण लावले. यानंतर डोक्याला उशी घालून, गोधडी घेऊन झोपून लेक्चर ऐकत होती. या मुलीचं हे विचित्र वागणं पाहून बाकीच्या बॅचमेट्सनाही आश्चर्य वाटलं. पण याबद्दल कोणाला काय वाटेल याची या मुलीला अजिबात पर्वा नव्हती. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. तो जवळपास ५ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Girl student reached the college with her mattress to attend the lecture because she wanted to stay in bed viral video google trend prp

ताज्या बातम्या