Viral Video: बॉलिवूडच्या कलाकारांची भुरळ कोणाला पडत नाही? चमचमत्या ताऱ्यांना कॉपी करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात आणि माणूसचं नव्हे बरं तर प्राणीही यात मागे नाहीत. असंच एक नवाझुद्दीन सिद्दीकीचं फॅन वाटणारं कासव एका कुत्र्याशी पंगा घेऊन लढत होतं. हा वाद आता इतका रंगलाय की सोशल मीडियावर त्यांच्या लढाईचा व्हिडीओ पार धुमाकूळ घालत आहे. आयपीएस अधिकारी अरीफ शेख यांनी या प्राण्यांच्या भांडणाचा व्हिडीओ शेअर करून त्यात नवाझुद्दीन सिद्दकीला सुद्धा विशेष टॅग केलं आहे. असं या व्हिडिओत नेमकं आहे काय हे पाहुयात..

Video: ATM ला गोठा समजली गाय, शेण सारवून राखत बसली; इतक्यात एक माणूस आला अन..

तुम्ही आयपीएस अधिकारी अरीफ शेख यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक कुत्रा बिचारा आधी शांत बसून आहे तर कासाव तोंड उघडून त्याला डिवचायला जातो. आधी एक वेळ कुत्राही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण तरीही कासव काही थांबत नसल्याने भडकून कुत्रा पार या इवल्याश्या कासवाची मानच धरतो. इतकं झाल्यावर तरी कासवाने माघार घ्यावी तर तो ही अजून दोन पायांवर उभा राहण्याचा प्रयत्न करून कासवाशी भांडायला लागतो. या दोघांमध्ये काय पूर्वीचा वाद असावा कळत नाही पण यांची लढाई पाहून आता नेमकं कोण कोणावर भारी पडेल याचा अंदाजच लावता येत नाही.

Video: चित्ता कितीही वेगवान असुदे पण ‘इथे’ कासवंच जिंकलं; नेटकरी म्हणतात, आयुष्यात सगळं पाहिलं पण हे..

आयपीएस अरीफ शेख यांनी हा अव्हिडीओ शेअर करताना हा कसावा नक्कीच नवाझुद्दीन सिद्दीकीचा फॅन असणार, म्हणूनच मौत को छुके टक करके वापस आया असं कॅप्शन दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कासव व कुत्र्याचं जुंपलं भांडण

तुम्हाला हा व्हिडीओ पाहून खरंच नवाझुद्दीनचा किक मधल्या भन्नाट भूमिकेची आठवण आली का? व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा.