Viral Video: पावसाळा सुरू झाला आहे. सगळीकडे निसर्गरम्य वातावरणही आहे. अनेकांना पावसाळ्याचा हंगाम आणि त्यात भिजायला खूप आवडते. सोशल मीडियावरही पावसात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच दोन तरुणी पावसात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
समाजमाध्यमांवर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतात. हल्ली सोशल मीडियावर जुनी मराठी गाणीदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत, ज्यावर लोक डान्स करताना दिसतात. त्यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. आता असाच एक डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन तरुणी काष्ठा साडी नेसून एका डोंगराळ परिसरात ‘हम को आज कल है इंतजार’ या हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या सुंदर डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरीही त्यांचे कौतुक करताना दिसत आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत आला आहे.
व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @real_funny_adinehapatil1507 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “अहा… सुंदर डान्स”, तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “आई गं नाद खुळा”, तर आणखी एकानं लिहिलंय, “खूपच छान डान्स.”