Unhygienic vegetables video : कढीपत्ता अनेक आरोग्यदायी फायद्यांनी समृद्ध आहे. आपण सर्व जण आपली डाळ, चटणी, सांबार आणि इतर अनेक भाज्या इत्यादीसाठी कढीपत्ता वापरतो. कढीपत्त्याला खूप छान सुगंध येतो. त्यामुळे आपल्या जेवणाला उत्कृष्ट चव आणि सुगंध मिळतो. मात्र, महिलांनो यापुढे बाजारातून कढीपत्ता विकत घेण्याआधी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही यापुढे बाजारातून कढीपत्ता विकत घेताना १०० वेळा विचार कराल.

सगळ्या भाज्या खाल्ल्या पाहिजेत, असं म्हणत आपण आहारात सर्व भाज्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण तसा विचार करीत असलो तरी त्याची दुसरी बाजू गंभीर आहे. कारण- भाजी मंडईभोवती अस्वच्छता वाढली आहे. त्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या पालेभाज्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असून, ग्राहक भाजी घेतात की आजार, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. इथपर्यंत ठीक होतं; मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून भाज्या थेट आता शेतातूनच आणायच्या का, असा सवाल उपस्थित होतोय. कारण- आता विक्रेते बाजारात प्रचंड रसायने फवारलेल्या भाज्या विकत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये गृहिणीने कढीपत्ता विकत आणला होता, हा कढीपत्ता जेवणात टाकताना महिलेला काहीतरी विचित्र दिसलं, मात्र त्यानंतर जे झालं, ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भाजी घेताना १०० वेळा विचार कराल हे नक्की…

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कढीपत्ता दिसत आहे, कढीपत्त्याची पानं आहेत; मात्र यातच एक विषारी किडाही आहे, जो सहज दिसत नाहीये. कारण- तो कढीपत्त्याच्या पानासारखाचा दिसणारा हिरवा किडा आहे. त्यामुळे भाजी घेतानाही आणि नंतर निवडतानाही महिलांनो काळजी घ्या. अनेकांचं असं म्हणणं आहे की, हे फुलपाखराचं कोश आहे, जे कढीपत्त्यावर तयार होत असताना हा कढीपत्ता तोडला आणि ते बाजाराच विक्रिसाठी आणले. त्यामुळे भाजी निवडताना नीट लक्ष दिले पाहिजे.

पाहा व्हिडीओ

बाजारात जेव्हा कधी आपण पालेभाज्या विकत घेण्यासाठी जातो तेव्हा त्या अगदी हिरव्यागार आणि ताज्या असाव्यात हे आपण कटाक्षाने निरखून पाहत असतो. पण, बाजारातून आपल्या ताटापर्यंत येणाऱ्या या पालेभाज्या नेमक्या कशा पिकवण्यात आल्या आहेत किंवा कुठून आल्या आहेत याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नसेल तर, सध्या व्हायरल झालेला एक व्हिडीओ पाहून तु्म्ही भाजी घेताना १०० वेळा विचार कराल. हा व्हिडीओ पाहून हे पाहिल्यानंतर तुमचेही डोळे विस्फारतील.