Viral Video Best Birthday Gift For 10th Student : दहावीची परीक्षा हा टप्पा जीवनात खूप महत्त्वाचा असतो. दरवर्षी फेब्रुवारी-मार्च या कालावधीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा होतात. महाराष्ट्र राज्यात प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी एसएससीची परीक्षा देत असतात; त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही एक स्पर्धा असते. त्यासाठी पालक सुद्धा विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसतात. कोण विद्यार्थ्यांचे वेळापत्रक बनवून ठेवतो, तर कोण त्यांना गेल्या वर्षीचे पेपर सोडवून सराव करण्यास सांगतो. पण, यासाठी सगळ्यात आधी मनापासून विद्यार्थ्यानेही तयारी करणे महत्वाचे आहे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी आपण ब्रश करण्यासाठी बाथरूममध्ये जातो. आरश्यात बघून आपण ब्रश करण्यास सुरुवात करतो आणि दिवसभर आपल्याला काय काय करायचं आहे हे आठवू लागतो. तर दिवभरात कंटाळा आला की, सतत आरशात केस नीट करतो, तर कधी स्वतःलाच एकटक बघत राहतो. तर व्हिडीओत येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याचा वाढदिवस असतो. विद्यार्थ्याला त्याची येत्या काही महिन्यात दहावीची परीक्षा आहे ही गोष्ट लक्षात रहावे म्हणून त्याला जबरदस्त गिफ्ट आणलेले असते. बाबा त्याच्या हातात गिफ्ट रॅप केलेला एक बॉक्स देतात.

असं गिफ्ट तुम्ही कधी पाहिलंच नसेल (Viral Video)

बॉक्स उघडताच त्यातून एक आरसा निघतो. तेव्हा विद्यार्थी थोडा विचारात पडतो. पण, जेव्हा आरशावर लिहिलेला मजूकर घरातील मंडळी बघतात; तेव्हा सगळेच पोट धरून हसायला लागतात. तर त्या आरशावर, “मी दहावीमध्ये आहे; चार महिन्यांनी माझी दहावीची बोर्डाची परीक्षा आहे” ; असा मजकूर लिहिण्यात आलेला असतो. म्हणजे तो जेव्हा केव्हाही आरसा बघेल तेव्हा आपली पुढच्या काही महिन्यात परीक्षा आहे याबद्दल त्याला जाणीव होईल. एकदा बघाच व्हायरल होणारा व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @vasu_the_poet या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “वाढदिवसाचे गिफ्ट” ; अशी कॅप्शन व्हिडीओला दिली आहे. व्हिडीओ पाहून सगळेच पोट धरून हसत आहेत आणि असे मजेशीर गिफ्ट पहिल्यांदाच बघितले असे आवर्जून म्हणताना दिसत आहेत. अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि टाईमपास न करता त्याने वेळच्यावेळी त्याने स्वतःचा अभ्यास केला पाहिजे यासाठी आरशावर हे छोटंसं रिमाइंडर देण्यात आले आहे.