Shocking video: साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो. मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. सध्या असाच एक जंगलातला एका अजगराचा थरारक व्हिडीओ समोर आलाय. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही सुन्न व्हाल. याचा सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचा थरकाप उडेल आणि त्यानंतर त्यामध्ये गावकऱ्यांनी जे केलं, ते पाहूनही धक्का बसेल.
सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते, तर काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. सापांसोबत मस्ती करुन त्यांचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. पण हा वेडेपणा काही तरुणांच्या अंगलट आल्याच्या धक्कादायक घटनाही घडल्या आहेत. मात्र आता सोशल मीडियावर समोर आलेला व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरच्या जहांगीराबाद भागात एका धक्कादायक घटना घडला आहे. याठिकाणी गावकऱ्यांनी आणि काही मुलांनी १५ फूट लांबीच्या एका महाकाय अजगराला चक्क हातात पकडलं. एवढंच नाहीतर सुमारे ३ किलोमिटरपर्यंत हातात अजगर घेऊन प्रवास केला. यावेळी अजगरानं जर त्याची ताकद दाखवली असती तर क्षणात बऱ्याच जणांचा खेळ खल्लास झाला असता. जहांगीराबाद कोतवाली परिसरातील डुंगरा जाट गावाजवळ अचानक एक अजगर दिसल्याने घबराट पसरली. गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या महाकाय सरपटणाऱ्या प्राण्याला पाहण्यासाठी गर्दी केली. काही मुलांनी अजगराला हातात धरले आणि बुलंदशहर रस्त्यावर घेऊन गेले.
पाहा व्हिडीओ
मुलांनी अजगराबरोबर रील बनवले आणि त्याचे फोटो काढले
जंगलात अजगर सोडण्यासाठी जाताना, मुलांनी अजगराभोवती पोज देत किंवा हातात धरून त्याचे व्हिडिओ बनवण्यास आणि फोटो काढण्यास सुरुवात केली. व्हायरल व्हिडिओमध्ये साहसी दृश्ये पाहायला मिळतात. रस्त्यावरून जाणाऱ्यांचीही मोठी गर्दी जमली होती.
वन विभागाला माहिती नाही
आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की गावातील कोणीही वन विभाग किंवा बुलंदशहर पोलिस स्टेशनमधील इतर कोणत्याही अधिकाऱ्यांना माहिती दिली नाही. अहवालानुसार, एसडीएम अनुपशहर प्रियंका गोयल म्हणाल्या की हे प्रकरण अद्याप त्यांच्या माहितीत नाही. त्या या संदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत.