Police Inspector Stealing Light Bulb: प्रयागराजच्या फुलपूर भागातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस निरीक्षक मध्यरात्री एका पान दुकानाबाहेरील लाइट बल्ब चोरताना दिसत आहे. ही चोरीची घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली असून सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या व्हिडिओवर लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर जाणून घेऊया या घटनेबद्दल…

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे व्हिडिओ

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फुलपूर कोतवालीमध्ये तैनात इन्स्पेक्टर राजेश वर्मा यांना एसएसपीने निलंबित केले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बंद पान दुकानाजवळ जाताना इन्स्पेक्टर चतुराईने इकडे तिकडे बघताना दिसत आहेत. मग तो पटकन दुकानाबाहेरचा एलईडी बल्ब काढतो, खिशात ठेवतो आणि निघून जातो.

( हे ही वाचा: Viral Video: भल्यामोठ्या अजगराला कोंबडीची हाव नडली… क्षणात झाला बंदिस्त; नेमकं काय घडलं पाहा)

पोलीस झाले चोर!

सदर घटना घडली तेव्हा हा पोलीस निरीक्षक रात्री नाईट ड्युटीवर होता. दुसर्‍या दिवशी सकाळी दुकानदाराच्या लक्षात आले की बल्ब गायब झाला, त्याने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि चोर पोलीसच असल्याचे त्याला समजले.

पोलिसाने चोरी केल्याचा व्हिडिओ येथे पाहा

( हे ही वाचा: Viral Video: लग्नमंडपात नवऱ्याची नजर चुकवत प्रियकराने नवरीच्या भांगात भरला ५ वेळा सिंदूर; त्यानंतर तिला ओढून…)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस निरीक्षका विरुद्ध चौकशीचे आदेश

आरोपी पोलीस निरीक्षकाला नुकतीच बढती मिळाली होती आणि तो गेल्या आठ महिन्यांपासून फुलपूर पोलीस ठाण्यात तैनात होता. घटनेची विचारपूस केल्यानंतर निलंबित पोलिसाने सांगितले की, अंधार असल्याने त्याने फक्त बल्ब काढला होता आणि तो जिथे ड्युटीवर होता तिथे ठेवला होता. आरोपी निरीक्षकाविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.