रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्या टी२० मध्ये न्यूझीलंडचा पाच विकेट्सनी पराभव केला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी२० मधील विजयासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या रोमांचक सामन्यात असे अनेक क्षण आले ज्याने चाहत्यांचे खूप मनोरंजन केले, परंतु एक क्षण असा होता ज्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित केले.

ही घटना भारतीय फलंदाजीदरम्यान घडली. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये रोहित शर्मा डगआउटमध्ये बसून मोहम्मद सिराजला पाठून एक फटका मारताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडला आहे.

( हे ही वाचा: तीन कोब्रा साप एकत्र! मेळघाटच्या जंगलातील दुर्मिळ फोटो व्हायरल )

नक्की काय झालं?

वास्तविक, जेव्हा टीम इंडिया विजयाकडे कूच करत होती, तेव्हा रोहित आणि इतर खेळाडू सिराजसोबत मस्ती करत होते आणि तेव्हाच हिटमॅनने सिराजला मागून मस्ती करत मारल्याचे दृश्य कॅमेरामनने टिपले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याचवेळी या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर एकीकडे मोहम्मद सिराजने किवी डावाच्या शेवटच्या षटकात शानदार गोलंदाजी करत अवघ्या सात धावांत एक बळी घेतला. त्याचवेळी रोहित शर्मानेही शानदार फलंदाजी करताना ४८ धावा करत संघाच्या विजयाचा पाया रचला.