Husband Wife Viral Video: माझी बायको किती भांडते, मी बायकोसमोर कसा मांजर बनून जातो असे मीम्स आपणही अनेकदा पाहिले असतील. कधी कधी त्यावर हसून रिऍक्टही केलं असेल. पण हे सर्व फक्त हसण्यावारी घेतलं तर ठीक. मुळात पती पत्नीचं नातं हे आंबटगोड असतंच, काही वेळा नवरोबा चुकतो तर काहीवेळा पत्नीकडूनही चुका होतात, खरंतर जशा चुका होतात तशा त्या मान्य केल्या तर अर्ध्याहून जास्त भांडणं टाळता येऊ शकतात पण अनेकदा असं होत नाही. अनेकदा पुरुषमंडळीही रुसून- फुगून बसत असली तरी बायकाच कशा हट्टी असतात हेच आपण सोशल मीडियावर जास्त पाहतो. पण मंडळी या व्हायरल होणाऱ्या मीम्सच्या अगदी उलट असा पती पत्नीचा एक व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत आहे. यामध्ये एका पत्नीने पतीसाठी केलेली कृती पाहून सर्वच थक्क झाले आहेत. नेमकं काय आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये चला पाहुयात…
तर, @hasnazarooriHai अशा एका ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये पत्नी आपल्या पतीचे पाय धुताना दिसत आहे. इतकेच नाही तर तिने पतीचे पाय धुतलेले पाणी चक्क पिते आणि नंतर पाय कपाळाला लावते. आपण पाहू शकता की पती दारात उभा आहे, तर पत्नी त्याचे पाय धुत आहे आणि तिच्या डोक्यावर पाणी शिंपडत आहे, ती पतीच्या पायाला स्पर्श करून पाणी पिताना दिसत आहे. बसला ना धक्का.. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या पतीकडे बाबा कुठून आणलीस रे अशी बायको असा प्रश्न केला आहे.
आणि पत्नीने पतीचे पाय धुवून प्यायले पाणी, व्हायरल व्हिडीओ
३ वर्षाच्या चिमुकलीचं बोलणं ऐकून डॉक्टरही थक्क; ‘कसंतरीच होतंय’ सांगणाऱ्यांना नक्की दाखवा हा Video
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून नेटकरी हा माणूस नेमका कोण आहे असहा प्रकारचे कॅप्शन देऊन वारंवार शेअर करत आहेत. तर यावर अनेक महिलांनी कमेंट करून कदाचित तिचा नवरा तितका गुणीच असावा अशीही प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर व्हिडीओवरून तरी हा सगळा प्रकार त्या महिलेने स्वेच्छेनेच केला असावा असे दिसतेय. अलीकडे सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी असे प्रकार अनेक जण करतात त्यातीलच हा एक व्हिडीओ असू शकतो. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला कमेंट करून कळवा.