Woman Builds Amazing 5 Burner Stove : गॅस चालू करून आपण झटपट जेवण बनवून मोकळे होतो. पण, मातीच्या चुलीवर शिजवलेल्या जेवणाची चव भरपूर वेगळी असते. सोशल मीडियाच्या या जगात तुम्ही चुलीवर स्वयंपाक करण्याचे अनेक व्हिडीओ नक्कीच पाहिले असतील. पण, आज असा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये जमिनीवर ५ बर्नरची गॅससारखी मातीची चुल बनवून महिलेने गॅसला टक्कर दिली आहे.

महिला प्रथम फावडे वापरून अधिक चिन्ह बनवण्यासाठी जमीन खोदताना दिसते. नंतर, त्यात आतमध्ये राहिलेले मातीचे तुकडे गोळा करून बाहेर काढते आणि त्यावर पाणी शिंपडते. त्यानंतर अधिक चिन्हावर ओल्या चिखलाने पूर्णपणे लेप लावून घेते. नंतर, त्या अधिक चिन्हात विटा रांगेत बसवून आणि त्यावर मातीचा थर लावून घेते. त्यानंतर रॉड आणि पातळ बांबूच्या तुकड्यांचा वापर करून बर्नरची रूपरेषा तयार करते. त्यानंतर स्टीलच्या किटलीने आणि ओल्या मातीचा वापर करून स्टोव्हला आकार देते.

त्याच मातीने सुंदर फिनिशिंग करते आणि सगळ्यात शेवटी गॅस स्टोव्हच्या बर्नरसारखे वर एक लोखंडी बर्नर ठेवते. त्यानंतर तयार स्टोव्हचा अंतिम लूक पाहून कोणीही थक्क होऊन जाईल. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ @hazratmondal02 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “माती आणि विटांपासून बनवलेला एक अद्भुत ५-बर्नर स्टोव्ह” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. या मातीच्या स्टोव्ह बनवण्याच्या व्हिडीओला फक्त एका आठवड्यात इन्स्टाग्रामवर ५४.६ दशलक्ष व्ह्यूज आणि ८५३,००० लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडीओ नक्की बघा…

इन्स्टाग्रामवर असंख्य व्ह्यूज मिळालेल्या या अद्भुत स्टोव्ह बनवण्याच्या व्हिडीओला अनेक कमेंट्स युजरकडून आल्या आहेत. पाच स्टोव्ह बनवणाऱ्या महिलेचे अनेकांनी कौतुक केले, तर काहींनी ही एक उत्तम कल्पना असल्याचे म्हंटले आहे. पण, अनेक युजर्सनी “आग विझल्यानंतर राख कशी काढली जाईल?” दुसरा, “उर्वरित तीन स्टोव्हमध्ये आग कशी पेटवली जाईल?” असे प्रश्न विचारले आणि काही जणांनी “वाह काकी तुमची कला मस्त आहे”, “मी या व्हिडीओला फक्त एक लाईक देऊ शकते”, “डिग्रीपेक्षा डोकं भारी!” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.