Passenger Records Accident Video : रॅपिडो (Rapido) कंपनीची बाईक सेवा अनेक शहरांमध्ये सुरू आहे. अनेकदा या बाईक सेवेचा उपयोग करताना प्रचंड वाईट अनुभव काही ग्राहकांना आले आहेत. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, यामध्ये चक्क एका तरुणीने रॅपिडो कंपनीच्या बाईकवरून जाताना स्वतःचा अपघात नकळत रेकॉर्ड केला आहे.

व्हायरल व्हिडीओ दिल्लीतील आहे. प्रियंकाने रॅपिडो कंपनीच्या बाईकवरून जाताना असुरक्षित वाटत असल्यामुळे व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. प्रियंकाने कॅप्शनमध्ये सांगितल्यानुसार बाईकवर बसल्यावर तरुणीने ड्रायव्हरकडे हेल्मेट मागितले. गरज नाही असे म्हणून त्याने स्वतःसुद्धा हेल्मेट घातले नाही आणि तरुणीलासुद्धा घालू दिले नाही. त्यानंतर विरुद्ध दिशेने त्याने गाडी चालवण्यास सुरुवात केली आणि भीतीने तरुणीच्या हृदयाचे ठोके वाढू लागले. त्यानंतर मग दुचाकीचालकाचे कृत्य स्वतःच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी तिने मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करण्यास सुरुवात केली.

बेफिकीर लोकांपेक्षा जबाबदार लोकांना कामावर ठेवा (Viral Video)

मेट्रो स्टेशन दुसऱ्या बाजूला असून विरुद्ध दिशेने गाडी चालवण्यास सुरुवात केल्यावर तरुणीने याबद्दल दुचाकीचालकाससुद्धा विचारले. तिथे भरपूर ट्रॅफिक आहे असे सांगून विरुद्ध दिशेने बाईक घेऊन जातोय असे सांगतो. यादरम्यान तो ‘हर हर महादेव’ हे गाणे ऐकत असतो. मग अचानक दुचाकीचालकाची बाईक, समोर येणाऱ्या दुसऱ्या बाईकला धडकली आणि दोघेही रस्त्यावर पडले. हा सगळा प्रसंग दिल्ली पोलिसांच्या गाडीसमोर घडला. रॅपिडो चालक जखमी झाल्यामुळे पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही आणि तरुणीने रॅपिडोचे पैसेही दिले, त्यानंतर तरुणी चालत मेट्रो स्टेशनला गेली.

व्हिडीओ नक्की बघा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bhangrabypahadan आणि @humorouspahadan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. संपूर्ण घटना सांगत तिने @rapidoapp @rapidocaptain यांना टॅग करून “बेफिकीर लोकांपेक्षा जबाबदार लोकांना कामावर ठेवावे. रॅपिडो तुझ्यावर स्वतःपेक्षाही अधिक विश्वास होता. आता हा विश्वास तुम्ही तोडलात. कारण पहिल्यांदाचा रॅपीडो बाईकवरून जाताना असुरक्षित वाटले”; अशी कॅप्शन सांगून व्हिडीओला दिली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून तरुणीची विचारपूस करत आहेत आणि काही जण त्यांचे रॅपिडो चालकाचे अनुभव कमेंटमध्ये शेअर करताना दिसत आहेत.