Viral Video: दोन वेळचे पोटभर अन्न मिळविण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करीत असतो. कष्ट करताना आलेल्या अडचणी, त्रास या सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद अनेकांमध्ये असते. अनेक गरीब, अपंग व्यक्तीही काही ना काहीतरी काम करून पैसे कमावतात. खरं तर, माणूस पैसा किती कमावतो यापेक्षा तो समाजात जगताना स्वाभिमान तर गहाण ठेवत नाही ना, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असते. पण, समाजात असे काही लोक आहेत, जे शरीराने धडधाकट असूनही फक्त जास्त पैसा कमावून श्रीमंत होण्यासाठी चोरी, लूटमार करतात. सोशल मीडियामुळे असे अनेक प्रकार वारंवार आपल्यासमोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

हल्ली लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन षडयंत्रे आखून चोरी करतात. पण, वाईट कर्माचे फळ कधी ना कधी मिळतेच. कितीही चलाख चोर असला तरी तो पोलिसांच्या तावडीतून सुटत नाही. परंतु, तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. अगदी पुरुषच काय महिलादेखील साळसूदपणाचा आव आणून मोठमोठ्या दुकानांमध्ये खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसतात आणि नकळत चोरी करण्याचा प्रयत्न करतात. आताही असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही सावध व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका साड्यांच्या दुकानामध्ये दोन वयस्कर महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने घुसतात आणि विक्रेत्याचे लक्ष विचलित करतात. यावेळी त्यातील एक जण दुकानातील कॅमेऱ्यासमोर साडी पकडून ठेवते; जेणेकरून साडीच्या पलीकडे दुसरी महिला नेमकी कशी चोरी करतेय हे दिसून येणार नाही. पण, साडी नीट न पकडल्यामुळे हा सर्व प्रकार दिसून येतो. याच वेळी साडीच्या पलीकडे उभी असलेली दुसरी चोरी करणारी महिला पटकन चार-पाच साड्या उचलते आणि तिने स्वतः नेसलेली साडी वर करून, त्या साडीच्या खाली ठेवलेल्या पिशवीत ठेवते. साडी पिशवीत गेली म्हटल्यावर दोघीही दुकानातून पसार व्हायला तयार होतात. परंतु, पिशवीमध्ये ठेवलेली साडी पिशवीतून बाहेर पडते आणि त्यांचा डाव तिथेच फसतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @crazy_reels69 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by CRAZY REELS (@crazy_reels69_)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “खूप शिकलेल्या बायका आहेत या आणि चोरी करतायत”. दुसऱ्याने लिहिलेय, “काही मोठे दुकानदार गरीब व्यक्ती साडी खरेदी करायला आली की, तिच्याकडे दुर्लक्ष करतात आणि अशा लोकांना जास्त भाव देतात”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “किती हलकट लोक आहेत”.