मला साबण खूप आवडतो.” असे म्हणत एका महिलेने चक्क साबणाचे दोन भाग केले आणि खाल्लेही. महिलेचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्व अवाक् झाले आहेत. अंघोळीचा साबण कोण खातं? असं तुम्हीही म्हणाल, तर काहींना यावर विश्वास बसणार नाही पण त्यामुळे तुम्ही थेट व्हिडीओच पाहा. सोशल मीडियावर दररोज अनोक व्हिडीओ व्हायरल होत असतात, काही हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ पाहून खरंच आश्चर्याचा धक्काच बसतो. पण या व्हिडिओमागचे सत्य कळेल तेव्हा तुम्ही आणखीनच थक्क व्हाल. काय आहे हे प्रकरण जाणून घेऊया.

बापरे तरुणीने चक्क साबण खाल्ला

girl was making the gesture to say bye to the rail staff as he waved the green flag from the transport
‘फक्त आनंद…’ हिरवा झेंडा फडकवणाऱ्या लोको पायलटला पाहून चिमुकलीची ‘ती’ गोंडस कृती; पाहा आजोबा-नातीचा ‘तो’ प्रेमळ VIDEO
Sonakshi Sinha Talks about wedding look
सोनाक्षी सिन्हाने भरजरी लेहेंग्याऐवजी लग्नात साडी का नेसली? घरीच का बांधली लग्नगाठ? म्हणाली, “झहीर आणि मला…”
Bharli Wangi with Sode recipe in marathi
बटाटा वांगी घालुन सोड्याचे झणझणीत कालवण; चमचमीत रेसिपी खाल तर खातच रहाल
Disgusting! Dacoit Ganga Prasad Eats Live Snake After Coming Out Of Jail In UP's Fatehpur
जिवंत साप पकडला, धुतला अन् खाल्ला; जेलमधून बाहेर येताच गुंडाचं विचित्र कृत्य; VIDEO पाहून थरकाप उडेल
sebi latest marathi news
‘बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना’ (भाग २)
javed Akhtar answer to user who called him son of gaddar
‘गद्दाराचे पुत्र’ म्हणणाऱ्यावर जावेद अख्तर भडकले, म्हणाले, “तुमचे पूर्वज ब्रिटीशांचे जोडे चाटत…”, नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
a poor girl sing a song so gracefully video goes viral
गरीबांच्या घरी टॅलेंटची कमी नाही! गोड आवाज ऐकून तुम्हीही व्हाल चिमुकलीचे चाहते, एकदा व्हिडीओ पाहाच
Man Wrote Message For His Wife In Back Of The Car Video Goes Viral
Photo: याला म्हणतात वडिलांचा धाक! तरुणानं गाडीच्या मागे लिहलं असं काही की पोट धरुन हसाल

या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेचे नाव सुची दत्ता असून ती कोलकाता येथील रहिवासी आहे. ती एक केक बेकर म्हणून फेमस आहे, वेगवेगळे केक बनवण्यासाठी ती ओळखली जाते. ती असे केक बनवते जे पाहून हा केक आहे यावर विश्वास ठेवणेही कठीण होऊन जातं. खाद्यप्रेमींना आकर्षित करण्यात ती कधीही कमी पडत नाही. ती केकपासून अशा वस्तू बनवते की तो केक आहे अशी शंकाही कुणाला येणार नाही.

असंच या साबणाचं आहे, ती जो साबण खात आहे, तो प्रत्यक्षात साबण नसून केक आहे. तिने केकला साबणासारखं बनवलं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुलगी उभी आहे आणि तिच्या समोरच्या टेबलवर डेटॉल आणि साबन आहे. दोन्हीपैकी तिला साबण आवडतो म्हणत ती साबण खायला लागते. नंतर जेव्हा ती तो कट करते तेव्हा समजतं की हा साबण नसून कपकेक आहे जो साबणासारखा बनवला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ज्या गाडीचं वडिलांनी आयुष्यभर स्वप्न पाहिलं…मुलानं तिचं गाडी गिफ्ट केली; VIDEO पाहून प्रत्येक पालकांचे डोळे पाणावतील

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर इतका व्हायरल झाला आहे की, त्याला आतापर्यंत व्हिडीओला ३० लाख व्ह्यूज मिळाले आहेत, तर सुमारे १.५ लाख लोकांनी त्याला लाईक केले आहे. सुचीने @21b_kolkata इन्स्टा हँडलवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, मला साबण खायला आवडते. हे कॅप्शन पाहून लोक आश्चर्यचकित झाले आणि मग विचार न करता कमेंट करू लागले. मात्र जेव्हा लोकांनी संपूर्ण व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना हे प्रकरण समजले.