Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो, जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपले जीव गमावले आहेत. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडविणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला वाहत्या पाण्यावर योगा करताना दिसतेय.

सोशल मीडियावरील नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंडनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनविताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक महिला स्वतःचा जीव धोक्यात घालून योगा करताना दिसतेय. अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जंगलामध्ये वाहत्या पाण्यावरील लाकडाच्या कमकुवत पुलावर एक महिला योगा करताना दिसतेय. यावेळी ती योगासन करण्यासाठी तिचा एक पाय वर करून तो बॅलन्स करण्याचा प्रयत्न करते; पण इतक्याच तिचा हात सटकतो आणि ती सरळ वाहत्या पाण्यात पडते. एकंदरीत वाहत्या पाण्यावरील पुलावर असा जीवघेणा स्टंट करणं तिला महागात पडतं.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @thebulletinx या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत नऊ लाखांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स विविध प्रकारच्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हायरल व्हिडीओवरील कमेंट्समध्ये लिहिताना एका युजरने म्हटलेय, “बापरे! खूप वाईट”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “अरे, एकच आयुष्य आहे. असा स्वतःचा जीव कशाला धोक्यात घालता”. तिसऱ्या युजरने लिहिलेय, “मूर्ख बाई”. चौथ्या युजरने लिहिलेय, “खूपच खतरनाक”.