काही दिवसांपुर्वी प्रदर्शित झालेल्या ‘डार्लिंग्ज’ चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली. यातील आलिया भट्ट आणि विजय वर्मा यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. या चित्रपटातील अनेक डायलॉग सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यातीलच एक डायलॉग आता पुन्हा व्हायरल होत आहे. पण यावेळी त्यात एक ट्विस्ट आहे. विजय वर्माबरोबर हा डायलॉग एक तरुणी बोलत आहे. आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करणारी कोण आहे ही तरुणी असा प्रश्न सर्वांना पडत आहे.

या तरुणीचे नाव चांदणी आहे. चांदणी मिमक्री आर्टिस्ट असून, आलिया भट्टची हुबेहूब नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध आहे. या व्हिडीओमध्ये चांदणी विजय वर्मासमोर आलिया भट्टची नक्कल करताना दिसत आहे. ती डार्लिंग्ज आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटातील डायलॉग हुबेहूब आलिया भट्टच्या आवाजात बोलत आहे. यावेळी ती आलियाच्या डायलॉगप्रमाणे विजय वर्माच्या हातावर चपलेने मारण्याचा अभिनय करते. विजय देखील यावर हसत प्रतिक्रिया देत या डायलॉगमध्ये सहभागी होतो. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा : लॉकडाउनमध्ये केलेल्या मदतीची त्याने ठेवली जाण; अनोख्या मैत्रीचा Viral Video एकदा पाहाच

व्हायरल व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Chandni Bhabhda ? (@chandnimimic)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदणीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ व्हायरल होत असून आत्तापर्यंत याला २ लाख ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.