Viral Video: सोशल मीडियावर दर दिवशी वेगवेगळे हटके व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी डान्सचे व्हिडीओ, तर कधी गाणी म्हणतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी एखादी हटके ट्रिक व्हायरल होते, तर कधी एखादं गाणं चर्चेत येतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये एक तरुण एका हिंदी गाण्यावर डान्स करताना दिसतोय.
कधी कधी काही पुरुष महिलांपेक्षाही खूप सुंदर डान्स करतात. हुबेहूब महिलांसारख्या डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभावही अगदी एखाद्या महिला डान्सरला लाजवतील इतके सुंदर असतात. सध्या अशाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो खूप छान डान्स करताना दिसतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण ‘बरसो रे मेघा मेघा’ या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. तरुण करत असलेला डान्स कमालीचा असून त्याने केलेल्या डान्स स्टेप्सही खूप कमालीच्या आहेत. त्याचा हा डान्स सध्या सोशल मीड्यावर खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gauravsitoulaa या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एकाने लिहिलंय की, “भावा, काय नाचलास तू”, तर दुसऱ्याने लिहिलंय, “एक नंबर डान्स”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “खूप छान, अतिशय सुंदर भावा.”