Viral Video: सध्या पावसाळा सुरू झाला आहे. सगळीकडे निसर्गरम्य वातावरणही आहे. अनेकांना पावसाळ्याचा हंगाम आणि त्यात भिजायला खूप आवडते. सोशल मीडियावरही पावसात भिजण्याचा आनंद लुटणाऱ्या अनेकांचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशातच एका चिमुकलीचा पावसात नाचतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये ती तरूणी पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटत सुंदर डान्स करताना दिसतेय.

नृत्य ही अशी कला आहे ही भल्याभल्यांना भुरळ घालते. काही कलाकारांसाठी प्रत्येक क्षण नृत्यासाठीच समर्पित असतो. ते कधीही कुठेही आणि कोणत्याही परिस्थिती आपली कला सादर करण्यासाठी तत्पर असतात. सध्या अशाच एका नृत्यप्रेमी तरूणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात ती भरपावसात नाचताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी भर पावसामध्ये ‘गरज गरज’ या गाण्यावर सुंदर डान्स करत आहे. तिच्या डान्समधील प्रत्येक स्टेपने युजर्सला भुरळ घातली असून तिचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rashi_agrwl या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर आतापर्यंत १ मिलियनहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “खूपच अप्रतिम सादरीकरण” तर आणखी एकाने लिहिलंय की, “अस्सल भारतीय नृत्य” तर आणखी एकाने लिहिलंय की, “काय कमाल केली हिने.”