Viral video: सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर काही व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. पण काही व्हिडीओ असे असतात ते पाहून कुठेतरी खरंच माणुसकी अजूनही आहे हे सिद्ध होतं. असाच माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गाड्या आहेत, ट्रॅफिक सगळीकडून जाम झालं आहे. मात्र एका बुलेट रायडरच्या माणुसकीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. बाईकस्वाराने भर वाहतूक कोंडीतून एका रुग्णवाहिकेला रुग्णालयात जाण्यासाठी वाट करुन दिली आहे. रुग्णवाहिकेला लवकरात लवकर पुढे जाता यावं यासाठी तो पुझे मार्ग करुन देत होता.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ३ दिवसांचं लहान बाळ असणाऱ्या रुग्णवाहिकेला हॉस्पिटलला जाण्यासाठी बाईक रायडरने केली मदत, असं लिहलं आहे. तसेच पुढे त्यांनी लिहले की, रुग्ण वाहिकेला मार्ग करून देण्यासाठी मदत…ही माणुसकी धर्माची माणसं आहेत व हा धर्मच आपल्याला पुढे न्यायचा आहे !मित्रांनी… खूप भारी काम केलं. या बाईक रायडरनं सोशल मीडियावर सर्वांचीच मनं जिंकली आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! एका पक्षानं दिली सिंहाला टक्कर; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, या व्यक्तीने दाखवलेल्या माणुसकीमुळे बाळाचे प्राण वाचले अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. n_i_l_k_h_o_d_k_a_ या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.