Virat Kohli and Shah Rukh Khan Fans Twitter War: IPL 2023 ची सुरूवात ३१ मार्चला होते आहे. त्याच्या दोन दिवस आधीच विराट कोहली आणि शाहरूख खान या दोघांचेही चाहते आमने-सामने आल्याचं पाहण्यास मिळालं. या दोघांच्या फॅन्समध्ये टक्कर पाहण्यास मिळाली. ट्वीटवर अक्षरशः वॉर रंगलं. शाहरुख खान आणि विराट कोहली या दोघांच्याही चाहत्यांनी एक-दुसऱ्यावर यथेच्छ टीका केली. कुणी विराट कोहलीचं गुणगान करत होतं तर कुणी शाहरुखचं.

का झालं ट्वीटर वॉर?

ट्वीटरवर विराट आणि शाहरुखच्या चाहत्यांचं ट्वीटर वॉर सुरू झालं. याचं कारण होतं या दोघांपैकी सर्वाधिक पॉप्युलर कोण. मात्र नेमका हा वाद का सुरू झाला? याचं कारण काही समोर आलेलं नाही. कुणी म्हणतंय शाहरुखच जगात भारी. तर कुणी म्हणतंय विराट जबरी प्लेअर. खरंतर या दोघांचीही क्षेत्रं पूर्णपणे वेगवेगळी आहेत. शाहरुख खान हा सिनेविश्वातला चमकता तारा आहे तर विराट कोहली हा स्पोर्ट्स स्टार आहे. शाहरुखच्या पठाण सिनेमाने नुकतंच भरघोस यश मिळवलं. विराटची कारकीर्दही उत्तम आहे. अशात या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? या दोघांमध्ये प्रसिद्ध कोण? या कारणावरून या दोघांचे चाहते ट्वीटवर भिडले.

काय घडतं आहे ट्वीटरवर?

ट्वीटरवर शाहरुख आणि विराट कोहली या दोघांचे चाहते एकमेकांना नावं ठेवत आहेत. एकमेकांशी वाद घालत आहेत. विराटचा खेळ किती भारी आहे, त्याचे इंस्टाग्राम फॉलोअर्स किती आहेत? ही उदाहरणं देत चाहते शाहरुखच्या चाहत्यांना सुनावत आहेत. तर दुसरीकडे शाहरुख खानचे चाहते हे शाहरुखच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. तसंच जगभरात शाहरुख किती प्रसिद्ध आहेत ते विराटच्या चाहत्यांना ट्वीटरवर ऐकवत आहेत. काही लोक वाद घालू नका दोघंही आपल्या जागी श्रेष्ठ आहेत असंही सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही हे चाहते भिडलेच आहेत. अनेक चाहत्यांनी हा सगळा वाद फुकटचा आहे. दोघंही आपल्या देशाचं नाव आपल्या आपल्या पातळीवर उंचावत आहेत असंही म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाहरुख आणि विराट चांगले मित्र

खरंतर शाहरुख खान आणि विराट कोहली यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. एवढंच काय? विराटची पत्नी अनुष्का शर्माने शाहरुखसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. चाहत्यांना या दोघांची जोडी आवडलीही होती. अशात आता काहीही कारण नसताना अकारणच विराट आणि शाहरुखचे चाहते एकमेकांमध्ये भिडले आहेत. ट्वीटरवर सकाळपासूनच हे विराटचं समर्थन करणारे ट्वीट्स आणि शाहरुखला भारी म्हणणारे ट्वीट व्हायरल होत आहेत.