राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची! ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”

राज्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशीच घडत असतानाच याचे पडसाद सोशल नेटवर्किंगवरही दिसत आहेत.

राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची! ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”
ही कमेंट सध्या चर्चेत आहे (फोटो सोशल मीडियावरुन साभार)

महाराष्ट्रामध्ये जागतिक योगदिनाच्या दिवशीच राजकीय घडामोडींना उधाण आलं असून शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाविरोधात कथित बंड पुकरालं असून सध्या ते शिवसेनेच्या काही आमदारांसोबत गुजरातमधील सूरतमध्ये आहेत. विधान परिषदेच्या निकालांमधील क्रॉस व्होटींगनंतर महाविकासआघाडीला हा आणखीन एक धक्का समजला जात असतानाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थिर असल्याचा दावा केलाय. मात्र दुसरीकडे शिवसेनेची चिंता वाढल्याचं चित्र सकाळपासून दिसत आहे.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या दिवशीच या साऱ्या घडामोडी घडत असतानाच याचे पडसाद सोशल नेटवर्किंगवरही दिसत आहेत. अनेकांनी या राजकीय नाट्याचासंबंध योगदिनासोबत जोडल्याचं सोशल मीडियावरील मिम्स पेजेवर दिसून येत आहे. अशाच प्रकारे हा अचूक योगायोग टिपणारा व्यक्ती म्हणजे, अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषिकेश जोशी. ऋषिकेशने फेसबुकवरुन यासंदर्भात एक मार्मिक पोस्ट केलीय. विशेष म्हणजेच अप्रत्यक्षपणे सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य करणाऱ्या या पोस्टवर मुंबईचे सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही मजेदार प्रतिक्रिया दिलीय.

झालं असं की राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्यामधील सरकार तरणार की बुडणार अशी चर्चा सुरु झालेली असतानाच अभिनेता ऋषिकेश जोशीने सकाळी पावणेबाराच्या सुमारास आपल्या फेसबुक पेजवरुन एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने एक पडलेल्या खुर्चीचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोला ऋषिकेशने केवळ ‘चेअर’ म्हणजेच खुर्ची एवढी एका शब्दाची कॅप्शन दिली होती.

ऋषिकेशच्या या फोटोवरुन अनेकांनी राज्यात सुरु असणाऱ्या राजकीय गोंधळाबरोबरच त्याचा संबंध योग दिनाशी जोडला. अनेकांनी हा योगायोग ऋषिकेशने चांगला जुळवून आणल्याचं म्हटलं. या पोस्टवर कमेंट्सचा पाऊस पडला. अगदी राजकीय कमेंट्सापासून ते शाब्दिक कोट्या करणाऱ्या अनेक कमेंट्स या पोस्टवर दिसून आल्या. मात्र या सर्व कमेंट्समध्ये सर्वाधिक लक्ष वेधलं ते विश्वास-नांगरे पाटील यांच्या कमेंटने. विश्वास-नांगरे पाटील यांनी या पोस्टवर कमेंट करताना, “खुर्ची योगा करवते, करत नाही भावा” असं म्हटलं होतं. विश्वास नांगरे-पाटील यांची ही कमेंट सध्या या पोस्टवर दिसत नाहीत. ही कमेंट् काढून टाकण्यात आल्याची चर्चा आहे. असं असलं तरी या कमेंटचा स्क्रीनशॉर्ट मात्र व्हायरल झालाय.

योगदिनीच एवढ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचा उत्तम संदर्भ अभिनेता ऋषिकेशने या खुर्चीशी जोडल्याचं या पोस्टच्या निमित्ताने पहायला मिळालं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
…अन् खड्ड्यात पडले स्कुटीस्वार पती-पत्नी, हा धक्कादायक VIRAL VIDEO पाहून हादरून जाल
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी