Accident video viral: जगभरात दररोज शेकडो रस्ते अपघात होतात. काही अपघात अत्यंत गंभीर तर काही अत्यंत किरकोळ असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे.

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एक धक्कादायक अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणाऱ्या एका रिक्षा आणि ट्रकच्या अपघातामध्ये ८ चिमुकली मुलं जखमी झाली आहेत. यासंदर्भातील वृत्त freepressjournal या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम येथील संगम सैराट चित्रपटगृहाजवळ आज सकाळी शाळेत जात असताना ऑटो-रिक्षा आणि ट्रकची धडक झाली. ज्यामध्ये आठ शाळकरी मुले जखमी झाली. प्राथमिक माहितीनुसार, ऑटो रिक्षा मुलांना शाळेत घेऊन जात असताना ट्रकने धडक दिली. या धडकेमुळे रिक्षा पलटी झाली, त्यात मुले जखमी झाली. तर त्यामध्ये एक मुलगी गंभीर झाल्याचं सांगितलं जातं आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलांना रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! २० लाखांच्या नोटांचा हार घालून घराच्या छतावर चढला व्यक्ती; पुढे नेमकं काय झालं? पाहा VIDEO

याआधी सोमवारी विशाखापट्टणम येथील समुद्रातील जेट्टीला लागलेल्या आगीत ३५ मासेमारी नौका जळून खाक झाल्या होत्या. अधिका-यांनी सांगितले की, घाट परिसरात एका बोटीला आग लागली आणि लगेचच इतर बोटींमध्ये ती पसरली. ते म्हणाले की, विशाखापट्टणम कंटेनर टर्मिनल आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन जवळच्या भागात ही आग लागली, जिथे मासेमारीच्या बोटी उभ्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दुर्घटनेत जळालेल्या प्रत्येक बोटीची सरासरी किंमत सुमारे ४० लाख रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.