जीवघेण्या करोना व्हायरसचं (Coronavirus) जगभरात थैमान सुरू असून दिवसागणिक मृतांच्या संख्येत वाढ होतेय. जगात दररोज शेकडो मृत्यूमुखी पडतायेत, तर अनेक देशांमधील शहरं लॉकडाउन झाली आहेत. अशातच सोशल मीडियावर रशियाबाबतचा एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

काय आहे व्हायरल मेसेज?:-
‘रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी देशातील जनतेला करोना व्हायरसमुळे घरातच राहण्याचं आवाहन केलंय आहे, पण लोकं ऐकण्यास तयार नाहीत, त्यामुळे त्यांनी तेथील रस्त्यांवर 800 वाघ आणि सिंहांना मोकळं सोडलंय’. अशाप्रकारचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेटकरी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा मेसेज शेअर करत आहेत. जाणून घेऊया सत्य –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे सत्य?:-
पण, सोशल मीडियातील या मेसेजची सत्यता पडताळण्यात आल्यानंतर तो खोटा असल्याचं स्पष्ट झालं आहे. व्हायरल होत असलेला फोटो चार वर्षांपूर्वीचा असल्याचं समोर आलं आहे. आफ्रिकेतील हा फोटो वर्ष 2016 मध्ये सर्वप्रथम ‘डेली मेल’मध्ये छापून आला होता. भारतात करोना व्हायरसबाबत अशाप्रकारचे अनेक फेक मेसेज व्हायरल होत आहेत. पण, कोणताही संवेदनशील मेसेज फॉरवर्ड करताना युजर्सनी खबरदारी  घेणे गरजेचे आहे.