Viral Video: पॅराग्लायडरच्या मदतीने आणि हवेच्या साह्याने आकाशात उडण्याचा थरार अनुभवणे म्हणजे पॅराग्लायडिंग. पॅराग्लायडिंगसाठी उंच टेकडीवर जाऊन हवेच्या मदतीनेच झेप घ्यावी लागते. पॅराग्लायडिंगमध्ये ग्लायडर, हर्नेस्ट, ब्रेक्स, एरोमीटर, व्हिरिओमीटर यांचा उपयोग केला जातो. या खेळामुळे आत्मविश्वास कमालीचा वाढतो. हा आत्मविश्वास फक्त खेळातच नव्हे, तर प्रत्यक्ष दैनंदिन कामातही दिसून येतो. पण, आज सोशल मीडियावर काहीतरी अनोखं पाहायला मिळालं आहे. त्यामध्ये एक तरुण पॅराग्लायडिंग करताना एक गिधाड येऊन त्याच्या डोक्यावर बसले आहे.

व्हायरल व्हिडीओ ब्राझीलचा आहे. ब्राझीलच्या जंगलात एक तरुण उत्साहाने पॅराग्लायडिंग करीत होता. पॅराग्लायडिंग करणाऱ्या तरुणाच्या साहसाने उत्साहाची नवीन उंची गाठली तेव्हा एका गिधाडानेही त्याच्यासह प्रवास करण्याचा निर्णय घेतला. तरुण पॅराग्लायडिंग करताना उंच आकाशात एक गिधाड उडत होते. तरुणाला पॅराग्लायडिंग करताना पाहून ते त्याच्याजवळ येते आणि हे अनोखे दृश्य सेल्फी कॅमेऱ्यात कैद होते. नक्की काय घडले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…उष्माघाताने त्रस्त माकडाला रहिवाशांकडून जीवदान; ओआरएस देऊन मालिश केली अन्… पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

काही जण प्राणी पक्ष्यांना खूप घाबरतात. अगदी डोक्यावरून एखादा पक्षी गेला तरी ओरडून, किंचाळून गोंधळ घालण्यास सुरुवात करतात. पण, व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, तरुणाने संरक्षणासाठी डोक्यावर घातलेल्या हेल्मेटवर आकाशात उडणारे गिधाड येऊन बसते. तरुणाच्या गॉगल, हेल्मेट व त्याच्या हातावर चोच मारताना दिसते. पण, या सगळ्या गोष्टी घडत असताना तरुण अगदीच शांत आणि या अनपेक्षित गोष्टीचा आनंद घेताना दिसला आहे; जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एकंदरीतच इन्स्टाग्राम व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नमूद केल्याप्रमाणे पॅराग्लायडिंग करताना पॅराग्लायडरबरोबर गिधाड असणे याला ‘पॅराहॉकिंग’ खेळ, असे म्हणतात; ज्यामध्ये पक्ष्यांना पॅराग्लायडर्ससह उडण्याचे प्रशिक्षण दिले जाते आणि हे पक्षी पॅराग्लायडिंग करणाऱ्या साहसी खेळाडूंना एक चांगला अनुभव देतात, असे सांगण्यात येत आहे. एकूणच या खास व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.