Viral Video : तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये जेवण करायला जाता, तेव्हा वेटर जेवण कसे वाढतो, याकडे आपले बारकाईने लक्ष असते. अनेकदा वेटरनी नीट जेवण सर्व्ह केले नाही तर आपण नाराजी सुद्धा व्यक्त करतो तर कधी वेटरने उत्तमपणे जेवण सर्व्ह केले तर आपण खूश होऊन आनंदाने टीप देतो. सोशल मीडियावर वेटर्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एका वेटरचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक वेटर एका ट्रेमध्ये असंख्य प्लेट सर्व्ह करण्यासाठी घेऊन जाताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक वेटर अन्नाने भरलेल्या असंख्य प्लेट्स एका ट्रेमध्ये घेऊन जाताना दिसत आहे.त्याने हा ट्रे एका हातात पकडला असून त्यावर असंख्य प्लेट्स दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना वाटेल की त्याच्या हातून ट्रे पडेल पण तो शेवटपर्यंत प्लेट्सनी भरलेला ट्रे घेऊन जातो. हॉटेलच्या किचन रूम पासून हॉटेलच्या गार्डनपर्यंत तो हा ट्रे घेऊन जातो. व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल. एका ट्रे मध्ये तुम्ही आजवर चार किंवा पाच प्लेट सर्व्ह करताना पाहिले असेल पण इतक्या प्लेट्स पाहून तु्म्हीही डोकं धराल.

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
Tigress chilling in a jungle stream on a hot summer
Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…
only 5 rupees lemon will clean the kettle
५ रुपयाचे लिंबू करेल केटलची चकचकीत सफाई! पाहा व्हायरल जुगाड व्हिडीओ

Ken Rutkowski या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या व्हिडीओवर तुम्ही काय टायटल लिहाल?” लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही लोकांनी त्याच्या बॅलेन्सींग करणाऱ्या कलेचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिलेय, “आयुष्य हे बॅलेन्सींगला धरुन चालते” तर एका युजरने लिहिलेय, “याला खूप सरावाची आवश्यकता असते.” आणखी एका युजरने लिहिलेय, “बापरे, व्हिडीओ पाहून अंगावर काटा आला.”